शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 06:14 IST

Raj -Uddhav Thackeray Alliance: अनेक दिवसांपासून राज्याला ठाकरे बंधूंच्या युतीची उत्सुकता होती. युतीमुळे  ठाकरे बंधूंच्या नव्या राजकीय पर्वाला सुरुवात झाली. या युतीमुळे राजकीय समीकरणे कशी बदलतात, काय परिणाम होतात, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, याच आपल्या भूमिकेला पुढे नेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी उद्धवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा केली. मुंबई महापालिकेत आम्ही एकत्र लढू आणि राज्यातील अन्य महापालिका निवडणूकही एकत्र लढण्याची घोषणा लवकरच करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईचा महापौर ‘मराठी’ आणि तो आमचाच असेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. भाजपला काय हवे ते भाजपने बघावे, मराठी माणसाला काय हवे ते आम्ही बघू, असे मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले. 

अनेक दिवसांपासून राज्याला ठाकरे बंधूंच्या युतीची उत्सुकता होती. युतीमुळे  ठाकरे बंधूंच्या नव्या राजकीय पर्वाला सुरुवात झाली. या युतीमुळे राजकीय समीकरणे कशी बदलतात, काय परिणाम होतात, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

‘महाराष्ट्रात लहान मुले पळविणाऱ्या टोळ्या’  महाराष्ट्रात लहान मुले पळविणाऱ्या खूप टोळ्या फिरताहेत. ते राजकीय पक्षांमधली मुले पळवतात. त्यामुळे मुंबईत कोण किती जागा लढवणार, हे आता सांगणार नाही, असा टोला राज यांनी भाजप आणि शिंदेसेनेला लगावला.

‘मुंबईसाठीचे कर्तव्य म्हणून आम्ही एकत्र’मराठी माणसाला सांगतोय, आता चुकाल तर संपाल. आता फुटाल तर पूर्णपणे संपून जाल. म्हणून, पुन्हा एकदा ‘तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका,’ महाराष्ट्राला हाच संदेश देत आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबईसाठी आमचे कर्तव्य म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत. मराठी माणसाला जे हवे आहे तेच आम्ही करत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘दोन्ही घरे आपलीच, मग बंद दाराआड चर्चा कशाला?’युतीचे जागावाटप कधी?, महापौरपदाबाबत काही चर्चा झाली आहे का? या प्रश्नांवर उद्धव ठाकरे यांनी, ‘दोन्ही घरे आपलीच असल्याने बंद दाराआड चर्चा कशाला करायची?’ असे विचारले. तर, ‘सगळे पक्ष बाहेर पडूनही महाविकास आघाडी अबाधित आहे,’ असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.

‘बघा किती एकमत झाले?‘खा. संजय राऊत यांनी प्रास्ताविक केले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे संवाद साधतील, असे म्हणत त्यांनी माइक दोघांपुढे सरकवला; पण, आधी कोण बोलणार, हे ठरले नसल्याने उद्धव यांनी राज यांच्याकडे माईक देत, ‘तू आधी बोल’ म्हटले. त्यावर राज त्यांना म्हणाले, ‘तू बोल.’ परंतु उद्धव यांनी पुन्हा राज यांना बोलण्याची विनंती केली. त्यावर राज यांनी, ‘अरे, तू बोल आधी,’ असे म्हणत माईक उद्धव यांच्या हाती दिला. तेव्हा उद्धव यांनी ‘बघा, आमच्यात किती एकमत झाले !’ असे म्हटल्याने हशा पिकला.

तीच ती स्क्रिप्ट बदलामराठी माणूस, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार हे स्क्रिप्ट अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे चालवत आहेत, त्यात काही तर बदल करा. मुंबईच्या विकासावर बोललात तर मी तुम्हाला एक हजार रुपये देईन, मागेही मी असेच आव्हान दिले होते; पण ते अजूनही विकासावर बोलत नाहीत. ठाकरे बंधू एकत्रित आले याचा आनंदच आहे; पण ते एकत्र आल्याने राजकीयदृष्ट्या फार काही घडेल असा कोणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

निवडणुका आल्यावर त्यांना मराठी माणूस आठवतो, मात्र मुंबईकर सूज्ञ आहेत, त्यांना विकास हवा आहे. त्यांनी मुंबईच्या विकासावर एक शब्दही काढला नाही. मुंबईकर मुंबईबाहेर फेकला गेला, मुंबईचे प्रकल्प कोणी अडवले, मुंबईला प्रदूषित करण्याचे काम कोणी केले? - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

 

English
हिंदी सारांश
Web Title : Thackeray Brothers Unite! Will it Change Maharashtra Politics?

Web Summary : Raj Thackeray announced an alliance with Uddhav Sena for Mumbai municipal elections, prioritizing Maharashtra over disputes. They aim for a 'Marathi' mayor. Uddhav emphasized unity for Mumbaikars' benefit. Political equations are set to shift.
टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेShiv SenaशिवसेनाBMC Electionsमुंबई महापालिका निवडणूक २०२६Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६