शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर राधाकृष्ण विखे पाटलांचा आमदारकीचाही राजीनामा; भाजपा प्रवेश कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 13:39 IST

विखे पाटलांसोबत आमदार अब्दुल सत्तारही भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

मुंबई : काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर आज आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मुंबईतील निवासस्थानी काँग्रेसच्या नाराज आमदारांची बैठक पार पडली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. लोकसभा निकालानंतर त्यांनी विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला होता. 

गेल्या काही वर्षांपासून राधाकृष्ण विखे पाटीलभाजपात जाणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मुख्यमंत्र्यांसोबतची वाढती जवळीकही तेच दर्शवत होती. मात्र, लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा मुलगा सुजय विखे यांना उमेदवारी देण्यावरून काँग्रेस राष्ट्रवादीसेबत मतभेद झाले होते. अहमदनगर राष्ट्रवादीकडे असल्याने काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांना राष्ट्रवादीकडून तिकीट घेण्यास सांगितल्याचा दावा विखे यांनीच केला होता. यामुळे सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश करत अहमदनगरची उमेदवारी मिळविली होती. 

लोकसभा निवडणुकीवेळी विखे पाटलांनी प्रचारापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ते अहमदनगरमध्येच तळ ठोकून होते. सुजय विखेंसाठी त्यांनी फिल्डींग लावली होती. सुजय खासदार झाल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगू लागली आहे. विखे पाटलांच्या मुंबईतील निवासस्थानी आज काँग्रेसचे नाराज आमदार दाखल झाले होते. यामध्ये अब्दुल सत्तार, भारत भालके, शिवसेनेचे नारायण पाटील आणि माढाचे रणजित निंबाळकर उपस्थित होते. यावेळी पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. 

अखेर राधाकृष्ण विखे पाटलांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. बैठकीनंतर विधानसभा भवनात दाखल होत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे विखे पाटलांनी आमदारकीचा राजीनामा सोपविला आहे. 

माझ्या सोबत कुणीही नाही. ज्यांची नावे घेतली जात आहेत ते केवळ माझे मित्र आहेत. त्यांची उगाच नावे घेणे योग्य नाही. भाजपमध्ये कधी प्रवेश करणार हे लवकरच जाहीर करेन. मात्र, मंत्रिपद देणार की नाही हा निर्णय त्या पक्षाचा असेल, असे राजीनामा दिल्यानंतर विखे पाटलांनी स्पष्ट केले. 

 

सत्तारांना विरोध?विखे पाटलांसोबत आमदार अब्दुल सत्तारही भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्यांच्या प्रवेशाला भाजपातून विरोध होत असल्याचे समजते आहे. राज्यात पुढील तीन महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार असून यामुळे विखे पाटलांच्या रिकाम्या झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होण्याची शक्यता कमी आहे. 17 जून रोजी पावसाळी अधिवेशन होणार असून त्याआधीच सर्व चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलcongressकाँग्रेसBJPभाजपाVidhan Bhavanविधान भवन