शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

अखेर मिळाली कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2017 01:55 IST

राज्यातील ३६ लाख शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा तसेच, त्यापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील ३६ लाख शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा तसेच, त्यापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी जास्तीची रक्कम भरल्यास त्यांना दीड लाख रुपयांची कर्जमाफी देण्याची तरतूद असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा आदेश सहकार विभागाने आज जारी केला. कर्जमाफीचा आदेश काढून देवेंद्र फडणवीस सरकारने शब्द पाळला. या कर्जमाफीचा फायदा राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना होणार असून त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर ३४ हजार २२ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. आजच्या आदेशानुसार १ एप्रिल २०१२ पासून ३० जून २०१६ रोजी थकित असलेले मुद्दल व व्याजासह दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले आहे. मुद्दल व व्याजासह दीड लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजना (वनटाईम सेटलमेंट) लागू करण्यात आली आहे. त्यानुसार, या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची रक्कम बँकेत जमा केल्यानंतर दीड लाख रुपयांची कर्जमाफी मिळेल. याचा अर्थ चार लाख रुपये थकबाकी असलेल्या शेतकऱ्याने अडीच लाख रुपये भरल्यास त्याला दीड लाखाची माफी मिळेल. असे एकूण आठ लाख शेतकरी आहेत. २०१५-१६ या वर्षात घेतलेल्या पीक कर्जाची ३० जून २०१६ पर्यंत पूर्णत: परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०१६-१७ या वर्षात घेतलेल्या कर्जाची रक्कम ३० जून २०१७ पर्यंत पूर्णत: परतफेड केल्यास त्यांना २०१५-१६ मधील परतफेड केलेल्या पीक कर्जाच्या २५ टक्के किंवा २५ हजार रुपये यातील जी रक्कम कमी असेल ती शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून दिली जाईल. तथापि, शेतकऱ्यांनी परतफेड केलेली रक्कम १५ हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर ती पूर्ण रक्कम शासन देईल. २०१२-१३ ते २०१५-१६ मध्ये कर्जाचे पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांपैकी जे ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असतील त्यांना वरील योजनेचा लाभ देण्यात येईल. तथापि, जे थकित नाहीत त्यांना २५ हजार रुपये शासनामार्फत अदा करण्यात येतील. या योजनेच्या लाभासाठी पुढील व्यक्ती अपात्र असतील आजी, माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी माजी खासदार, आमदार, जिल्हा परिषद आणि महापालिका सदस्य, केंद्र व राज्य सरकारचे अधिकारी, कर्मचारी (चतुर्थ श्रेणी वगळून), शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती, निवृत्तीवेतनधारक (माजी सैनिक वगळून) व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन १५ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना वगळण्यात आले आहे.या शिवाय, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सुतगिरणी, नागरी सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दूध संघांचे अधिकारी व पदाधिकारी (अध्यक्ष व उपाध्यक्ष) आणि मजूर सहकारी संस्थांचे अध्यक्ष, तीन लाख रुपयांपेक्षा जास्त ढोबळ उत्पन्न असलेली सेवा कर भरण्यासाठी नोंदणीकृत व्यक्ती, जी व्यक्ती मूल्यवर्धित कर व सेवा कर कायद्यांतर्गत नोंदणीकृत आहे व ज्यांची २०१६-१७ मधील वार्षिक उलाढाल १० लाख रु.आहे अशा व्यक्तीही अपात्र ठरतील.