शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे सरकारचा 'हा' महत्वपूर्ण निर्णय; राज्यातील विकासाला मिळणार गती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 20:19 IST

कोरोना आणि लाॅकडाऊनच्या संकटामुळे शासनाने राज्यातील सर्वच विकास कामांना कट लावला होता...

ठळक मुद्देजिल्हा नियोजन व आमदार स्थानिक विकास निधी शंभर टक्के खर्च करण्यास शासनाची परवानगी 

पुणे :  कोरोना आणि लाॅकडाऊनच्या संकटामुळे शासनाने राज्यातील सर्वच विकास कामांना कट लावला होता. परंतु राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असताना व आगामी जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने जिल्हा वार्षिक योजना आणि आमदार स्थानिक विकास निधी साठी शंभर टक्के खर्च करण्यास परवानगी दिली आहे. 

कोरोनाचे संकट आणि लाॅकडाऊन यामुळे राज्य शासनाने एकूण विकास निधीतील केवळ 33 टक्केच निधी खर्च करण्यास परवानगी देताना त्यातीलही 50 टक्के निधी केवळ आरोग्यावर खर्च करण्याचे बंधन घातले होते. परंतु आता शासनाना जमा होणारा महसूल आणि  बांधील खर्चाच्या आवश्यक निधीचा आढावा घेऊन टप्प्याटप्याने निधी वितरणास परवानगी दिली आहे. 

शासनाने निधी खर्चासाठी परवानगी देण्यासाठी काढलेल्या आदेशात रोजगार निर्मितीस चालना देण्यास भांडवली खर्च केला जातो, अशा बाबींसाठी यंदाच्या अर्थसंकल्पीय निधी मधील 75 टक्के खर्च वितरणास मान्यता देण्यात आली आहे. स्थानिक आमदार विकास निधी अंतर्गत निधी शंभर टक्के खर्च वितरणास मान्यता दिली असून , जिल्हा वार्षिक योजनेतील सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती घटक कार्यक्रम या अंतर्गत शंभर टक्के निधी वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. हे आदेश देताना शासनाने 16 एप्रिल रोजी काढलेले परिपत्रक आणि 4 मे रोजी चा शासन निर्णय यामध्ये देण्यात आलेल्या सूचना लक्षात घेऊन निधी वितरण करण्याच्या सूचना जिल्हा नियोजन समितीच्या आणि संबंधित विभागांना दिले आहेत.------पुणे जिल्ह्यासाठी सन 2020-21 साठी 650 कोटीचा विकास आरखडा मंजूर करण्यात आला होता. परंतु या विकास आरखड्याला देखील 33 टक्के म्हणजे 214.5 कोटी रूपयांचा कट लावण्यात आला होता. यामुळे जिल्ह्यातील प्रस्तावित अंगणवाडी बांधकामे, सरकारी कार्यालयांची बांधकामे, नवीन रस्ते यादी सर्वच कामांना ब्रेक लागला होता. परंतु आता शंभर टक्के निधी खर्च करण्यास परवानी देताना टप्प्या-टप्प्याने निधी देखील देण्यात येणार आहे. ------ग्रामीण भागातील विकास कामांना गती मिळेल... कोरोनामुळे शासनाने विकास निधीला कट लावल्याने गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून बहुतेक सर्वच विकास कामे ठप्प झाली होती. परंतु दिवाळीच्या मुहूर्तावर शासनाने निधी शंभर टक्के खर्च करण्यास परवानगी दिली ही खूप चांगले झाले  यामुळे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील रखडलेल्या विकास कामांना गती मिळेल.- निर्मला पानसरे, जिल्हा परिषद अध्यक्षा

टॅग्स :PuneपुणेState Governmentराज्य सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्याzpजिल्हा परिषद