अखेर स्वच्छतेचे फलक हटविले - आॅनलाईन लोकमतची मंत्र्यांनी घेतली दखल
By Admin | Updated: August 8, 2016 14:25 IST2016-08-08T14:19:34+5:302016-08-08T14:25:03+5:30
स्वच्छतेत महाराष्ट्र नं. १ या फलकाच्या खालीच घाणीचे साम्राज्य असल्याचे वृत्त लोकमत आॅनलाईनवर झळकताच त्याची दखल घेत पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी सदर फलक तेथून हटविण्याचे आदेश दिले.

अखेर स्वच्छतेचे फलक हटविले - आॅनलाईन लोकमतची मंत्र्यांनी घेतली दखल
>अशरफ पटेल/ गजानन गोरे
ऑनलाइन लोकमत
देउळगावराजा (बुलडाणा), दि. ८ - स्वच्छतेत महाराष्ट्र नं. १ या फलकाच्या खालीच घाणीचे साम्राज्य असल्याचे वृत्त लोकमत आॅनलाईनवर झळकले. याची दखल घेत पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी बुलडाणा जिल्हाधिका-यांना सदर फलक
तेथून हटविण्याचे आदेश दिले. त्यानंतर तत्काळ सदर फलक दुस-या ठिकाणी लावण्यात आले. यासोबतच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बसस्थानक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्याचे आदेश आगार प्रमुखांना दिले आहेत.
देउळगाव राजा येथे बसस्थानक परिसरात शासनाने स्वच्छता अभियानात महाराष्ट्र नं. १ असे फलक लावण्यात आले होते. मात्र या फलकाच्या खालीच घाण साचली होती. याबाबतचे वृत्त आॅनलाईन लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले. त्यानंतर पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी आॅनलाईनला सदर वृत्त पाहल्यानंतर बुलडाण्याचे जिल्हाधिकारी विकास झाडे यांना सदर फलक त्वरीत हटविण्याचे आदेश दिले. जिल्हाधिका-यांनी देउळगावचे उपविभागीय अधिकारी व नगर पालिकेच्या मुख्याधिका-यांना सूचना केल्या. त्यानुसार ७ आॅगस्ट रोजी नागपंचमीच्या सुटीच्या दिवशीही कर्मचाºयांनी तत्काळ फलक हटवून दुस-या
ठिकाणी लावले. यासोबतच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीही बसस्थानक परिसरात स्वच्छता करण्याचे आदेश बुलडाणा आगार प्रमुखांना दिले. बुलडाणा आगार प्रमुखांनी सोमवारी सकाळीच देउळगाव राजाला जावून बसस्थानक परिसराची
पाहणी केली.
स्वच्छतेचे फलक हटविले घाण कायम
शासनाने लावलेले स्वच्छतेचे फलक शासनाने हटविले खरे मात्र घाण अजूनही तेथे कायमच आहे. घाणीच्या वरच स्वच्छता अभियानाचे फलक लावले होते. याबाबत वृत्त झळकताच शासनाने याची गंभीर दखल घेतली. मात्र स्वच्छता करण्याऐवजी
त्यांनी फलक हटविण्याला प्राधान्य दिले. जिल्हाधिकारी डॉ विजय झाड़े यांनी पाहिणी करुण सफाई करण्यासाठी आदेश दिले तर बसस्थानक प्रशासनास सचलेल्या पाण्याचा प्रवहा काढण्यासाठी मदत करावी असे आदेश दिले.
- मदन जाधव, प्रभारी मुख्याधिकारी, देऊळगाव राजा.