शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कृषी विद्यापीठाने गुणपत्रिकेवरील ‘प्रमोटेड कोविड-१९’चा उल्लेख वगळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 06:12 IST

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश घेणाऱ्या कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड-१९’ असा शिक्का असणार होता. तशी तयारी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी चालविली होती.

अमरावती : कृषी विद्यापीठांतील बी.एस्सी. प्रथम, द्वितीय व तृतीय सत्र विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील ‘प्रमोटेड कोविड-१९’ हा उल्लेख वगळण्यात आला असून विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका वितरित करण्यात येणार आहे. याबाबत ‘लोकमत’ने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची तातडीने दखल घेत विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोरोनाचा उल्लेख करण्याचा निर्णय कोणी घेतला, याची चौकशी करण्याचे  निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेला दिले आहेत.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश घेणाऱ्या कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड-१९’ असा शिक्का असणार होता. तशी तयारी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी चालविली होती. मात्र, ‘लोकमत’ंने ही बातमी प्रकाशित करून कृ षी विद्यापीठांचे मनसुबे हाणून पाडले. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याचे कृषिमंत्र्यांनी घोषणा केली आहे. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील परीक्षा विभागातील गुणपत्रिकेच्या फारमॅटवरून ‘प्रमोटेड कोविड-१९’ असा उल्लेख वगळण्यात आला आहे. या प्रकरणी राज्य सरकारने चारही कृषी विद्यापीठांना करणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.महाविद्यालयांना नोटिसाअकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ‘प्रमोटेड कोविड-१९’ गुणपत्रिकेवर उल्लेख केल्याबद्दल कृषी महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. वास्तविक, ‘प्रमोटेड कोविड-१९’ असा शिक्का कृषी विद्यापीठानेच पाठविला असताना महाविद्यालयांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा पाठवण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

कृषी विद्यापीठाने ‘प्रमोटेड कोविड-१९’ असा गुणपत्रिकेवरील उल्लेख वगळला आहे. आता विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका वितरित करण्यात येतील. तसे कृषी विद्यापीठातील परीक्षा विभागाने कळविले आहे.- शशांक देशमुख, प्राचार्य, श्री शिवाजी कॉलेज आॅफ हॉर्टिकल्चर.............................

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEducationशिक्षण