संघर्षपूर्ण राजकारणाची अखेरची निवडणूक

By Admin | Updated: September 8, 2014 02:49 IST2014-09-08T02:49:55+5:302014-09-08T02:49:55+5:30

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी रविवारी आपल्या राजकीय वाटचालीला एक वेगळे वळण दिले. गेली ४५ वर्षे सक्रिय राजकारणात असणारे डॉ. कदम यांनी आठ वेळा विधानसभेची निवडणूक लढविली

The final election of struggling politics | संघर्षपूर्ण राजकारणाची अखेरची निवडणूक

संघर्षपूर्ण राजकारणाची अखेरची निवडणूक

वसंत भोसले, कोल्हापूर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी रविवारी आपल्या राजकीय वाटचालीला एक वेगळे वळण दिले. गेली ४५ वर्षे सक्रिय राजकारणात असणारे डॉ. कदम यांनी आठ वेळा विधानसभेची निवडणूक लढविली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही शेवटची निवडणूक लढविणार असल्याचे सांगून त्यांच्या राजकारणाला नवे वळण दिले.
सांगली जिल्ह्यातील सोनहिरा खोऱ्यातील सोनसळ गावी ८ जानेवारी १९४४ रोजी जन्मलेल्या डॉ. कदम यांनी आपला राजकीय प्रवास एसटी महामंडळाचे संचालक म्हणून सुरू केला. १९७८ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर भिलवडी-वांगी हा खानापूर आणि तासगाव तालुक्यांतर्गत मतदारसंघ निर्माण करण्यात आला. त्या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी त्यांनी तेव्हापासून केली. १९८० मध्ये त्यांनी विधानसभेची पहिली निवडणूक काँग्रेसचे उमेदवार संपतराव चव्हाण यांच्याविरुद्ध लढविली आणि केवळ २३३ मतांनी ते हरले.
पहिल्याच निवडणुकीपासून त्यांना बंडखोरी, संघर्ष आणि तीव्र राजकीय लढा द्यावा लागला, तो आजअखेर सुरू आहे. त्यानंतर १९८५, १९९०, १९९५, १९९७ (पोटनिवडणूक), १९९९, २००४ आणि २००९च्या विधानसभा निवडणुका त्यांनी लढविल्या. एकूण आठ निवडणुकांपैकी दोन वेळा ते अपक्ष म्हणून लढले. उर्वरित सहा वेळा काँग्रेसचे उमेदवार म्हणून रिंग्ांणात राहिले. या आठपैकी पोटनिवडणुकीसह तीन निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला, तर पाच निवडणुकांमध्ये ते विजयी झाले. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हा त्यांच्या विरोधकांनी राष्ट्रवादीतून लढून त्यांना प्रखर विरोध केला. त्यावेळच्या प्रचारसभेत ते म्हणायचे, ‘माझे राजकीय जीवन ही दुसरी बाजू आहे. शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रांतील कार्य हा माझा मुख्य आधार आहे.’ आणि ते त्या निवडणुकीत प्रचंड मतांनी निवडून आले. पूर्वी सुधाकरराव नाईक, शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम केले. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या गेल्या १५ वर्षांतील सरकारमध्ये ते कायम कॅबिनेट मंत्री म्हणून महत्त्वाच्या पदावर कार्यरत राहिले आहेत.
आगामी निवडणुकीतदेखील त्यांना पहिल्या निवडणुकीसारखाच राजकीय संघर्ष करावा लागणार आहे. अशा संघर्षपूर्ण नेत्याने वयाच्या ७०व्या वर्षी, ‘ही माझी अखेरची निवडणूक आहे,’ अशी घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे पडसाद मतदारसंघासह जिल्ह्याच्या राजकारणातदेखील उमटतील.

Web Title: The final election of struggling politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.