शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

एसी डबल डेकर ‘स्पेशल’ ट्रेन चालवण्यावर भर

By admin | Updated: December 26, 2014 04:25 IST

कोकण मार्गावरील एसी डबल डेकर ट्रेन सुरुवातीला स्पेशल म्हणून धावल्यावर यापुढे ती ट्रेन नियमित म्हणून न चालवता फक्त ‘स्पेशल’ म्हणूनच चालवण्यावर मध्य रेल्वेकडून भर देण्यात येत आहे

मुंबई : कोकण मार्गावरील एसी डबल डेकर ट्रेन सुरुवातीला स्पेशल म्हणून धावल्यावर यापुढे ती ट्रेन नियमित म्हणून न चालवता फक्त ‘स्पेशल’ म्हणूनच चालवण्यावर मध्य रेल्वेकडून भर देण्यात येत आहे. त्यामुळे कोकणवासीयांना गर्दीच्या वेळेतच ती नजरेस पडेल, असे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. तत्पूर्वी ही ट्रेन दक्षिण विभागातही चालवण्याचा विचार वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. बारा डब्यांची असलेली एसी डबल डेकर ट्रेन यापूर्वी पूर्व मध्य विभागात भोपाळ-इंदौर मार्गावर धावत होती. मात्र कोकण मार्गावर पहिल्यांदा एसी डबल डेकर ट्रेन सुरू करीत असल्याचे सांगत गणेशोत्सवात ट्रेन सुरू करण्याला मुहूर्त दिला. कुठलेही नियोजन न करता प्रिमियम म्हणून ट्रेन चालवल्यावर त्याकडे कोकणवासीयांनी पाठ फिरवली. दिवाळीत पुन्हा नॉन प्रिमियम म्हणून चालवल्यावर त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. पण या दोन्ही गर्दीच्या काळात ट्रेन चालवताना ती स्पेशल म्हणूनच मध्य रेल्वेकडून चालवली. गणेशोत्सवामध्ये एसी डबल डेकर ट्रेन चालवण्यासाठी मध्य रेल्वेने घाईघाईने रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून स्पेशल ट्रेन म्हणून परवानगी घेत ही ट्रेन चालवली. मात्र त्यानंतर या ट्रेनला नियमित म्हणून चालवण्यासाठी कुठलेही प्रयत्न मध्य रेल्वेकडून केले नाहीत. उलट ही ट्रेन आता हिवाळी सुट्टीतही न चालवता थेट लोअर परेल वर्कशॉपमध्ये दुरुस्तीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे डबल डेकर ट्रेन काही दिवसांतच वर्कशॉपमध्ये गेल्यानंतर एक ते सव्वा महिना तेथे मुक्काम करावा लागेल. याबाबत मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांना विचारले असता, एसी डबल डेकर ट्रेन सुरुवातीला स्पेशल म्हणून धावली. ही ट्रेन नियमित म्हणूनही धावू शकते. मात्र त्यासाठी मध्य रेल्वेकडून प्रस्ताव येणे आवश्यक आहे. आतापर्यंत त्यांच्याकडून विचारणा झालेली नाही की प्रस्तावही आलेला नाही, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)