शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

जालना ड्रायपोर्टसाठी जमिनीचा मार्ग मोकळा

By admin | Updated: November 11, 2015 02:41 IST

जालना येथील प्रस्तावित ड्रायपोर्टसाठी जमीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया नोव्हेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे

विकास राऊत, औरंगाबादजालना येथील प्रस्तावित ड्रायपोर्टसाठी जमीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया नोव्हेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीत दिले.सुमारे ५०० एकर जमिनीवर १,५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून साकारणाऱ्या या प्रकल्पाचा मूळ उद्देश मराठवाड्यातील आयात-निर्यातीला चालना मिळणे हा आहे. या वेळी खा. रावसाहेब दानवे, जेएनपीटीचे चेअरमन अनिल डिग्गीकर, जेएनपीटीचे विश्वस्त विवेक देशपांडे, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, गोपाल चटर्जी, जालना जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक उपस्थित होते. ‘ज्या ठिकाणी ड्रायपोर्ट प्रस्तावित आहे ती जागा शासकीय आहे. १०८ हेक्टर जमीन शासनाकडे होती. ५३ हेक्टर जमीन सरकारी धोरणानुसार वाटप झालेली आहे. ती जमीन ताब्यात घेण्यात येणार आहे. १५ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. जमिनीची किंमत ८५ कोटींपर्यंत आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमार्फत ही प्रक्रिया पूर्ण होईल. जमिनीचा प्रश्न मार्गी लागल्यात जमा असून, नोव्हेंबरनंतर पुढील प्रक्रियेला वेग येणार आहे. ३० नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल,’ असे विवेक देशपांडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.