मधुकर पिचड यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
By Admin | Updated: August 9, 2016 21:12 IST2016-08-09T21:12:33+5:302016-08-09T21:12:33+5:30
धनगर समाजाविरोधात नाशिक येथील जाहीर सभेत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची

मधुकर पिचड यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 09 - धनगर समाजाविरोधात नाशिक येथील जाहीर सभेत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेने
मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी पिचड असे वादग्रस्त वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोपही संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला आहे.
पाटील म्हणाले की, धनगर समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण दिल्यास आदिवासी तरूणांच्या हाती बंदुका देऊन नक्षलवादी करेन, असे वक्तव्य पिचड यांनी 6 ऑगस्टला केले होते. यामुळे धनगर समाजाच्या भावना दुखावून आदिवासी
समाजात असंतोषाची भावना निर्माण करण्याचे काम पिचड करत आहेत. मात्र आदिवासी विरोधात धनगर असा वाद पेटवून समाजात फूट पाडू पाहणा-या पिचड यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे. शिवाय
नक्षलवादाला खतपाणी घालणारे वक्तव्य केल्याबाबत त्यांच्याविरोधात सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आवाहनही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.