सरकारविरोधात दाखल करा मनुष्यवधाचा गुन्हा, अशोक चव्हाण यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 05:09 AM2018-01-30T05:09:25+5:302018-01-30T05:09:50+5:30

जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन ही सरकारी हत्या असून या प्रकरणी सरकारविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल करा,

 Filed against the government, the demand for human rights, Ashok Chavan's demand | सरकारविरोधात दाखल करा मनुष्यवधाचा गुन्हा, अशोक चव्हाण यांची मागणी

सरकारविरोधात दाखल करा मनुष्यवधाचा गुन्हा, अशोक चव्हाण यांची मागणी

Next

मुंबई : जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन ही सरकारी हत्या असून या प्रकरणी सरकारविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
एका ८४ वर्ष वयाच्या शेतकºयाला न्याय मिळत नसल्याने मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या करावी लागते ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे. संपादित जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून धर्मा पाटील गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रालयाच्या चकरा मारत होते. त्यांनी मंत्र्यांना निवेदनेही दिली होती. पण भ्रष्ट सरकारी यंत्रणेने पाटील यांच्या अर्ज आणि निवेदनावर काहीच कारवाई केली नाही.
तीन महिने पाठपुरावा करूनही सरकारकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने नाईलाजाने त्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे गेल्या साडेतीन वर्षात
साडे तेरा हजारांपेक्षा जास्त शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. मंत्रालयात येऊन शेतकरी आत्महत्या करतायेत. त्यांची मुले-मुलीही आत्महत्या करू लागले आहेत त्यांचा सरकारवर विश्वास नाही, त्यामुळे राज्यातील सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही, अशी टीका चव्हाण यांनी केली.

मंत्र्यांनी जमीन
खरेदी केलीच कशी?
धर्मा पाटील यांनी विषप्राशन केल्यानंतर सरकारने वाढीव अनुदान देण्याची घोषणा केली. एका वयोवृद्ध शेतकºयाने आपला जीव धोक्यात घातल्यानंतर सरकारला जाग येते. त्यापूर्वी हे सरकार झोपले होते का? असा सवाल करुन विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील वीजनिर्मिती प्रकल्पाच्या भूसंपादनामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असताना तत्कालीन आमदार व एक विद्यमान मंत्री प्रकल्पात गेलेली जमीन कशी खरेदी करू शकतात, असा सवाल विखे पाटील यांनी केला.

रावल यांनी खरेदी
केलेल्या जमिनीची चौकशी करा-राष्ट्रवादी
सरकारी प्रकल्प असणाºया गावातील जमिनी कवडीमोलाने खरेदी करून त्या महागड्या दरात विकण्याचा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचा धंदाच असून त्यांनी खरेदी केलेल्या जमिनीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्टÑवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटरवरून केली आहे.

जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन झाले. या शेतकरीविरोधी सरकारने एकप्रकारे त्यांची हत्याच केली आहे.
- खा. सुप्रिया सुळे,
राष्ट्रवादी काँग्रेस

ही आत्महत्या नाही तर हत्या असून त्यास सरकार जबाबदार आहे. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. राज्य सरकारला कलंक लावणारा हा प्रकार आहे. शेतकºयांचा आक्रोशही सरकारला ऐकू येत नाही. विकास हवा आहे पण शेतकºयांचे मृत्यू जर मंत्रालयाच्या दारात होत असतील तर असा विकास नको.
- खा. संजय राऊत, शिवसेना

अन् शासकीय यंत्रणा झाली गतिमान

फेरमूल्यांकन सुरू: प्रशासन खडबडून जागे

धुळे : विखरण येथील वयोवृद्ध शेतकरी धर्मा मंगा पाटील यांच्या मृत्यूनंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली असून विखरण व मेथी शिवारात संपादित केलेल्या १९९ हेक्टर जमिनीच्या फेरमूल्यांकनाचे काम सुरू झाले आहे. पण सरकारची ही कृती उशीरा सुचलेले शहाणपण आहे, अशी भावना गावकºयांनी व्यक्त केली.

जिल्हा प्रशासनातील अधिकाºयांनी आज दिवसभरात या जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी केली. त्याचा अहवाल मंगळवारी मंत्रालयात होणाºया बैठकीत सादर केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिली.

शेतकरी धर्मा पाटील यांच्या शेतात झालेल्या झाडांच्या पंचनाम्यावर कुठलीही तारीख नाही, पंचाच्या सह्यासुद्धा नाहीत. जमीन मालकाची सही नाही. यावरून कृषी अधिकाºयांनी कार्यालयात बसूनच पंचनामे केले, हे सिद्ध होत आहे, असा खळबळजनक आरोप धुळे शहराचे भाजपा आमदार अनिल गोटे यांनी एका निवेदनाद्वारे केला आहे.

Web Title:  Filed against the government, the demand for human rights, Ashok Chavan's demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.