शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आकडे वेगवेगळे

By Admin | Updated: January 24, 2016 00:10 IST2016-01-24T00:10:10+5:302016-01-24T00:10:10+5:30

महाराष्ट्रात २0१५ साली एक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, असे दोनच् दिवसांपूर्वी राज्य सरकारने उच्च न्यायालयात सांगितले असले तरी सरकारच्याच मदत व पुनर्वसन खात्याच्या

The figures for farmers' suicides vary | शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आकडे वेगवेगळे

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आकडे वेगवेगळे

मुंबई : महाराष्ट्रात २0१५ साली एक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, असे दोनच् दिवसांपूर्वी राज्य सरकारने उच्च न्यायालयात सांगितले असले तरी सरकारच्याच मदत व पुनर्वसन खात्याच्या आकड्यांनुसार या वर्षात ३२२८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मदत आणि पुनर्वसन खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्या करणाऱ्या ३२२८ पैकी १८४१ शेतकऱ्यांची कुटुंबे भरपाई मिळण्यास पात्र आहेत.
कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी दावा केला की राज्य सरकारने उच्च न्यायालयात सादर केलेली माहिती आणि आपल्या खात्याचे आकडे वेगवेगळे असले तरी ते दोन्ही बरोबरचआहेत.
ज्या शेतकऱ्यांनी केवळ शेतीविषयक कारणास्तव आत्महत्या केल्या आणि ज्यांची कुटुंबे त्या
भरपाई मिळण्यास पात्र आहेत, त्यांची माहिती सरकारने न्यायालयासमोर ठेवली आहे.
मात्र, राज्य सरकारनेच श्ेतकऱ्यांच्या आत्महत्यासंदर्भात दोन वेगवेगळे आकडे सादर केल्यामुळे विधिमंडळाच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही या प्रश्नावर सरकारला धारेवर धरू, असे
विरोधी पक्षांतर्फे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: The figures for farmers' suicides vary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.