शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
3
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
4
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
5
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
6
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
7
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
8
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
9
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
10
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
11
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
12
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
13
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
14
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
15
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
16
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
17
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
18
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
19
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
20
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न

यौद्धा लढतोय पेन्शनसाठी...

By admin | Updated: August 23, 2016 02:24 IST

१९६५ व १९७१ च्या भारत-पाक युद्धातील युद्धसैनिक आयुष्याच्या उत्तरार्धात पेन्शनसाठी भटकंती करतो आहे. ११ वर्षे

नामदेव मोरे,

नवी मुंबई- सिडकोने क्रिकेट व गोल्फसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने उपलब्ध करून दिली आहेत. परंतु आॅलिम्पिकमध्ये सहभाग असणाऱ्या खेळांसाठी मैदान व आंतरराष्ट्रीय दर्जाचे एकही मैदान व प्रशिक्षण केंद्र उपलब्ध नाही. खेळाच्या नावाखाली क्लबचे स्तोम वाढविण्यावर भर दिला आहे. कुस्तीपासून इतर खेळांना दुय्यम स्थान दिल्यामुळे सुनियोजित शहरासाठीही आॅलिम्पिक पदक दिवास्वप्नच ठरत आहे. नवी मुंबईची रचना करताना प्रत्येक सेक्टरमध्ये मैदान उपलब्ध करून देण्याचे धोरण निश्चित केले होते. महापालिका व खाजगी शाळांनाही स्वतंत्र मैदान उपलब्ध करून दिले आहे. प्रत्येक नोडमध्ये स्पोर्ट क्लब व विविध क्रीडा संघटनांसाठी भूखंड आरक्षित केले आहेत. परंतु प्रत्यक्षात या मैदानांचा वापर आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी होत नाही. शहरामध्ये कुस्तीची आवड असणारे हजारो नागरिक आहेत. कृष्णा रासकर, वैभव रासकर यांच्यापासून अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविलेले खेळाडू शहरात वास्तव्य करत आहेत. २० वर्षे महापालिका व सिडकोकडे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्तीकेंद्र उभारण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. परंतु सिडको व महापालिकेने आश्वासनांशिवाय दुसरे काहीही केलेले नाही. ट्रक टर्मिनलजवळ मोकळ्या जागेत पत्र्याचे शेड टाकून कुस्तीगीर सराव करत आहेत. नेरूळ सेक्टर ६ मध्ये बापू उणावणे यांनी सम्राट क्रीडा अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू केले होते. परंतू सिडकोने त्यांना सक्तीने भूखंड मोकळा करण्यास भाग पाडले. मैदानच नसल्याने राज्यपातळीवर चमक दाखविलेले ५० पेक्षा जास्त मल्लांना अर्ध्यावरतीच खेळ सोडावा लागला आहे. जीममध्ये जावून पिळदार शरीर बनविणे व मैदानावर क्रिकेट खेळणे याव्यतिरिक्त कोणत्याही खेळांना प्राधान्य दिले जात नाही. सिडकोने अनेक क्रीडा संघटनांना भूखंडांचे वितरण केले आहे. परंतू या संघटनांना चांगले खेळाडू घडविण्यात अपयश आले आहे. नवी मुंबईमधील खेळ हा शालेय स्पर्धांपुरताच मर्यादित राहिला आहे. राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतल्यास दहावीच्या परीक्षेत जादा दहा गुण मिळतात म्हणूनच खेळांमध्ये सहभाग घेतला जातो. आॅलिम्पिकमध्ये ज्या खेळांचा सहभाग आहे त्यांचे प्रशिक्षण देणारे एकही केंद्र नवी मुंबईमध्ये नाही. शहरामध्ये वर्षभर ५ ते ६ मॅरेथॉन स्पर्धा होतात. परंतू त्या स्पर्धांमध्ये गांभीर्य नसते. इव्हेंटचे स्वरूप दिले जात असून त्यामधून खेळाडू घडण्यासाठीचे प्रयत्नच होत नाहीत. महापालिकेच्या सर्व मैदानांची दुरवस्था झाली आहे. शाळांनी त्यांच्या ताब्यातील मैदानांना टाळे लावले आहेत. अनेक ठिकाणी मैदानांचा वापर वाहनतळ म्हणून केला जात आहे. झोपडपट्टीतील नागरिकांसाठी मैदानाचा भूखंड नाही. खेळाडूंसाठी मैदाने व प्रशिक्षणाची सुविधा नसताना आॅलिंपिक विजेते खेळाडू कसे तयार होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. >क्रिकेटचे मैदान धूळखात सिडकोने डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट अ‍ॅकॅडमीला १२ वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी नेरूळमध्ये एक लाख चौरस मीटरचा भूखंड दिला. विजय पाटील यांनी तेथे भव्य स्टेडीयम उभारले. परंतु अद्याप त्या मैदानामध्ये एकही आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅच होवू शकली नाही. २०१९ मध्ये युवा फुटबॉल विश्वचषक होणार असला तरी या मैदानाचा खेळाडू घडविण्यासाठी फारसा उपयोग झाला नाही. >सिडको कुस्तीसाठी भूखंड देत नाही व महापालिकेच्या आखाड्याला मुहूर्त मिळेना झाला. यामुळे ट्रक टर्मिनलजवळ पत्र्याचे शेडमध्ये आखाडा सुरू आहे. ५० खेळाडू येथे प्रशिक्षण घेत आहेत. आर. के. शिरगावकर, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते खेळाडू कृष्णा रासकर, प्रशिक्षक दत्तात्रय दुबे यांनी आखाडा सुरू ठेवलाय.