विदर्भातील सहा जिल्ह्यांना पीक विमा हप्त्यात पन्नास टक्के सवलत

By Admin | Updated: August 1, 2014 02:24 IST2014-08-01T01:54:36+5:302014-08-01T02:24:01+5:30

विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना शासनाकडून विशेष सवलत.

Fifty percent concession in crop insurance premium for six districts of Vidarbha | विदर्भातील सहा जिल्ह्यांना पीक विमा हप्त्यात पन्नास टक्के सवलत

विदर्भातील सहा जिल्ह्यांना पीक विमा हप्त्यात पन्नास टक्के सवलत

राजरत्न सिरसाट/अकोला
राष्ट्रीय पीक विमा योजनेतंर्गत विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना शासनाकडून विशेष सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार कापसाचा पीक विमा काढताना अल्पभूधारक शेतकर्‍यांना एकूण विमा हप्त्याच्या पंचवीस तर इतर भूधारक ांना पन्नास टक्केच रक्कम भरावी लागते. देशात केवळ सहा जिल्ह्यांसाठी या विशेष पॅकेजअंतर्गत ही सवलत असल्याने, या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकर्‍यांची अनुकूलता आता वाढली आहे.
नैसर्गिक आपत्ती, कोरडा अथवा ओला दुष्काळ पडल्यास पिकांचे प्रचंड नुकसान होते. त्या नुकसानीची दखल शासनस्तरावर तर घेतलीच जाते, पंरतु राष्ट्रीय पीक विमा योजनेतंर्गत शेतकर्‍यांना हमखास नुकसान भरपाईही दिली जाते. त्यासाठीच राष्ट्रीय स्तरावर ही योजना सुरू करण्यात आली असून, देशभरात या योजनेला शेतकर्‍यांचा चांगला प्रतिसाद मिळाला; परंतु विदर्भात ही योजना रू जविण्यासाठी अधिकार्‍यांना अपेक्षित यश मिळाले नाही.
या योजनेत कापूस, सोयाबीन, मुग, उडीद, तूर, भुईमूग, तीळ व ज्वारी या खरीपातील आठ पिकांचा समावेश करण्यात आला असून, कापूस पिकासाठी अल्पभूधारक शेतकर्‍यांना ७५ टक्के तर इतर भूधारकांना ५0 टक्के सवलत अर्थात एकूण विमा हप्त्याच्या अनुक्रमे २५ व ५0 टक्केच रक्कम शेतकर्‍यांना भरावी लागते. विशेष म्हणजे ,विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती व यवतमाळ हे सहा जिल्हे सोडून इतर ठिकाणी विमा हप्त्याची ही सवलत केवळ १0 टक्के एवढीच आहे.
विशेष पॅकेजअंतर्गत देण्यात येणार्‍या या योजनेत पीकाचा जोखीम स्तर ६0 टक्के आहे. विमा दर १३ टक्के असून, कापूस या पिकाचा सर्वसाधारण विमा हप्ता हेक्टरी २७५६ रू पये आहे. अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या विम्याची ७५ टक्के रक्कम अर्थात २0६७ रू पये शासनाकडून भरले जात असल्यामुळे या शेतकर्‍यांना प्रती हेक्टरी केवळ ६८९ रू पये एवढा २५ टक्के हप्ता भरावा लागतो.
देशात, केवळ विदर्भातील सहा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयांना राष्ट्रीय पीक विमा योजनेत विशेष पॅकेजतंर्गत सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, उशिरा पाऊस सुरू झाल्याने या योजनेची मुदत १६ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली असल्याचे जिल्हा कृषी अधिक्षक - प्रमोद लहाळे यांनी सांगीतले.


*पीक विम्यास मुदतवाढ
या खरीप हंगामातील पीक विमा काढण्याची मुदत ३१ जूलै २0१४ रोजी संपणार होती. पावसाची अनिश्‍चितता व उशीरा झालेल्या पेरणीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान टाळण्यासाठी या योजनेची मुदत आता १६ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.

Web Title: Fifty percent concession in crop insurance premium for six districts of Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.