गोवंडीतील भीषण आग आटोक्यात

By Admin | Updated: May 6, 2016 08:33 IST2016-05-06T08:33:15+5:302016-05-06T08:33:15+5:30

गोवंडीच्या भीमवाडी झोपडपट्टी परिसरात लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे

The fierce fire in Govandi fire | गोवंडीतील भीषण आग आटोक्यात

गोवंडीतील भीषण आग आटोक्यात

>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 06 - गोवंडीच्या भीमवाडी झोपडपट्टी परिसरात लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या आणि आठ वॉटर टँकर्सच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. पहाटे चारच्या सुमारास ही आग लागली होती. ज्यानंतर अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी रवाना झाले होते. सिलेंडरचा स्फोट होऊ ही आग लागली असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. 
 
या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र प्रचंड नुकसान झालं आहे. आगीत सुमारे 20 ते 30 घरं जळून खाक झाली आहेत. आग विझवताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला आहे. उपचारासाठी त्याला जवळच्या शासकीय रुग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे. आग पुर्णपणे नियंत्रणात आली असून सध्या कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. 

Web Title: The fierce fire in Govandi fire