लोकलमध्ये विवस्त्र करून बेदम मारहाण

By Admin | Updated: February 18, 2016 06:54 IST2016-02-18T06:54:14+5:302016-02-18T06:54:14+5:30

मध्य रेल्वेमार्गावर लोकलमध्ये दोन तरुणांना विवस्त्र करून बेदम मारहाण केल्याची एक मोबाइल क्लिप बुधवारी व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हायरल झाली.

Fierce assault by the naked in the local area | लोकलमध्ये विवस्त्र करून बेदम मारहाण

लोकलमध्ये विवस्त्र करून बेदम मारहाण

मुंबई : मध्य रेल्वेमार्गावर लोकलमध्ये दोन तरुणांना विवस्त्र करून बेदम मारहाण केल्याची एक मोबाइल क्लिप बुधवारी व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हायरल झाली. मारहाणीचे हे धक्कादायक चित्रीकरण रेल्वे पोलिसांपर्यंत पोहोचताच त्याची दखल घेणे भाग पडले. त्यानंतर वेगाने सूत्रे हलून सर्व यंत्रणा कामाला लागली. ही मोबाइल क्लिप नेमकी कधीची आहे, कोणत्या स्थानकावरील आहे, हे तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.
लोकलच्या एका डब्यात दोन तरुणांना विवस्त्र करून अन्य दोन ते तीन तरुण बेदम मारहाण करीत असल्याचे या क्लिपमध्ये दिसत आहे. विवस्त्र असलेल्या तरुणांकडून हात जोडून वारंवार विनवन्या केल्या जात असल्याचेही चित्रित झाले आहे. तथापि, मारहाण करणारे तरुण काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. हा धक्कादायक प्रकार होताना अन्य प्रवाशांनी बघ्याची भूमिका घेतली. काही प्रवासी तर हा प्रकार मोबाइलवर चित्रित करीत होते. या दोन्ही तरुणांना मारहाण केल्यानंतर त्यांना एका स्थानकातील प्लॅटफॉर्मवर उतरवून त्याच अवस्थेत पट्ट्याने मारहाण करण्यात आली. या प्रकाराचे गांभीर्य ओळखून रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास करण्याचा निर्णय घेतला. (प्रतिनिधी)

Web Title: Fierce assault by the naked in the local area