शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

टिकटॉक बंद झाल्यानं आम्ही उद्ध्वस्त झालो; दोन बायकांचा धनी म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 8:55 AM

मोदी सरकारकडून टिकटॉकवर बंदी; अनेक टिकटॉक स्टार चिंतेत

धुळे: टिकटॉकनं अनेकांना प्रसिद्धी दिली. कित्येकांना एखाद्या सेलिब्रिटीसारखं वलय मिळवून दिलं. मात्र केंद्र सरकारनं घेतलेल्या एका निर्णयानं टिकटॉक स्टार चिंतेत आहेत. टिकटॉक बंद झालं. आता पुढे काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. धुळ्यात राहणारे दिनेश पवारदेखील टिकटॉकमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले. दोन पत्नींसह टिकटॉक व्हिडीओ करणाऱ्या दिनेश पवार यांना सरकारनं घेतलेल्या बंदीच्या निर्णयामुळे धक्का बसला. आम्ही उद्ध्वस्त झालो. टिकटॉकवरील बंदीची बातमी ऐकून माझ्या दोन्ही बायका अक्षरश: ढसाढसा रडल्या, अशा शब्दांमध्ये पवार यांनी त्यांच्या भावना बोलून दाखवल्या.पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. १५ जूनला या भागात रक्तरंजित संघर्ष झाल्यानं परिस्थिती आणखी चिघळली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं काही चिनी अ‍ॅप देशासाठी धोकादायक असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिली. त्यानंतर मोदी सरकारनं ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. यामध्ये टिकटॉकचाही समावेश आहे. या निर्णयाचा मोठा फटका टिकटॉकच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवलेल्यांना बसला आहे.धुळे जिल्ह्यात राहणारे दिनेश पवार टिकटॉवर अतिशय प्रसिद्ध होते. त्यामुळे सरकारच्या  निर्णयामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. 'आम्ही उद्ध्वस्त झालो. मात्र आमच्या बाबतीत हा प्रकार घडलेला नाही, याची आम्हाला कल्पना आहे. टिकटॉकवरील बंदीची बातमी पाहून माझ्या दोन्ही बायका ढसाढसा रडल्या. या निर्णयामुळे आमच्यासारखेच लाखो जण दुखावले गेले आहेत,' असं पवार म्हणाले. आता यूट्यूबकडे जाण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.दिनेश पवार नव्वदच्या दशकातील बॉलिवूड चित्रपटांमधील गाण्यांवर नृत्य करून टिकटॉक व्हिडीओ तयार करायचे. या व्हिडीओमध्ये त्यांच्या दोन्ही पत्नीदेखील असायच्या. यामधून त्यांनी ३० लाखांची कमाई केल्याची चर्चा होती. मात्र ही बाब पवार यांनी फेटाळली. आम्हाला त्यातून पैसे मिळायचे नाहीत. मात्र आमची प्रसिद्धीची इच्छा पूर्ण झाली, असं पवार यांनी सांगितलं.‘याला म्हणतात कर्माचे फळ...’! टिकटॉक बॅन होताच पुन्हा एकदा ट्रेंड होतोय कॅरी मिनाटी!!अ‍ॅप बंद करण्याच्या निर्णयाबाबत चीनने व्यक्त केली गंभीर चिंता; प्ले स्टोअर्सवरून टिकटॉक गायब

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉक