शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

राममंदिरावरून दंगलींची भीती; जिल्ह्याजिल्ह्यांत ‘शांतता मार्च’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 06:52 IST

प्रकाश आंबेडकर; वंचित बहुजन आघाडी सलोखा वाढविणार

औरंगाबाद : सध्या हिंदू-मुस्लिम तेढ वाढविण्याचे प्रयत्न होत आहेत. न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा न करता राममंदिर बांधण्याची तारीख निश्चित करणे असंवैधानिक आहे. त्यातून पुन्हा एकदा जातीय दंगली घडण्याची शक्यता अमेरिकेच्या रॉ एजन्सीनेही व्यक्त केली आहे. किमान महाराष्ट्रात तरी शांतता राहावी यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्ह्या-जिल्ह्यांत ‘शांतता मार्च’ काढले जातील, असे वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे सांगितले.ते म्हणाले, दोन महिन्यांपासून रा. स्व. संघ व मोहन भागवत यांनी कुठल्याही परिस्थितीत अयोध्येत राममंदिर बांधण्याचा धोशा लावला आहे. न्यायालयाचा निकाल येवो न येवो आम्ही राममंदिराचे बांधकाम सुरू करणार, अशी घोषणा झाली आहे. २१ फेब्रुवारी ही तारीखही जाहीर झाली आहे. मग साडेचार वर्षे हे सरकार काय करीत होते? कुंभकर्णी झोपेत होते. अलीकडेच झालेल्या काही राज्यांच्या निवडणुकांनंतर केंद्रातले सरकार पुन्हा येईल, अशी परिस्थिती दिसत नाही. म्हणून धार्मिक तेढ वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. न्यायालयाचा निकाल लवकर यावा, ही अपेक्षा आहे; परंतु रा. स्व. संघासारख्या संघटना राष्ट्रपतींच्या आधिपत्याखालील प्रशासन मानत नाहीत. त्यांची समांतर प्रशासन व्यवस्था असून, ती संविधानाला व देशाला घातक आहे. म्हणूनच निकाल येईपर्यंत सर्वांनी शांतता ठेवायला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले....तर ‘ते’ यापुढेही ठोकले जातीलरामदास आठवलेंबाबत एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, त्यांनी नीतिमत्ता जोपासावी; अन्यथा ते यापुढेही ठोकले जातील. १० फेब्रुवारीला रिपब्लिकन पक्षाचा जबिंदा लॉन्सवर महामेळावा आहे. त्या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी हे वक्तव्य केले आहे. माझ्यात बाबासाहेब पाहण्यापेक्षा, मला प्रकाश आंबेडकर म्हणूनच जगू द्या, असे ते म्हणाले.दंगे होऊ देणार नाही : न्यायालयाचा निकाल येईपर्यंतही ही मंडळी थांबायला तयार नाही, हे दुर्दैव असून, परिस्थिती बिघडू नये, याची काळजी वंचित बहुजन आघाडी घेणार आहे. आमच्या जिल्ह्यात शांतता राहील. दंगल होऊ देणार नाही, याची ग्वाही आम्ही देणार असल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघRam Mandirराम मंदिरBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९