शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

कोळसा संकटाने राज्यात वीज उत्पादन ठप्प होण्याची भीती; केवळ दोन दिवसांचा स्टॉक उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 09:13 IST

तीन दिवसांपेक्षा कमी कोळशाचा स्टॉक असेल तर वीज केंद्रासाठी अतिसंवेदनशील स्थिती मानली जाते. राज्यातील सर्व वीज केंद्रे सध्या या श्रेणीत आली आहेत.

नागपूर: राज्यातील औष्णिक वीज केंद्रांमध्ये भीषण कोळसा संकट निर्माण झाले आहे. अर्धा ते दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध असल्याने राज्यातील वीज केंद्रे संवेदनशील स्थितीत पोहोचली आहेत. राज्यातील चार युनिटचे उत्पादन कोळसा नसल्याने ठप्प पडले असून, कोराडी औष्णिक वीज केंद्रातील ६६० मेगावॅट क्षमतेचे युनिट क्रमांक ६ कधीही बंद होऊ शकते. तीन दिवसांपेक्षा कमी कोळशाचा स्टॉक असेल तर वीज केंद्रासाठी अतिसंवेदनशील स्थिती मानली जाते. राज्यातील सर्व वीज केंद्रे सध्या या श्रेणीत आली आहेत. महाजेनको सूत्रानुसार, वेकोलिकडून अनेक दिवसांपासून अपेक्षित १८ रॅकऐवजी केवळ १० रॅकचा पुरवठा होत आहे. सर्व कोळसा कंपन्यांमधून दररोज २५ रॅक कोळशाचा पुरवठा अपेक्षित असतो. परंतु सध्या सरासरी १८ रॅक मिळत आहेत. यामुळे केंद्रांमधील स्टॉक कमी होत आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाल्याने कोळसा उत्पादन प्रभावित झाले. वाहतुकीतही समस्या येत आहे. त्यामुळे स्टॉक कमी होत चालला आहे. सध्या रोजच्या पुरवठ्यावर भागवले जात आहे. गुरुवारी विजेची मागणी १८,०३७ मेगावॅट होती. ही पूर्ण करण्यात आल्याचा दावा महावितरणने केला. परंतु भविष्यात संकट उभे राहू शकते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रशासनाने वेळीच हालचाल केली नाही तर विजेची समस्या उभी राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.वीज केंद्रातील कोळशाची स्थितीकेंद्र                     उपलब्ध स्टॉकखापरखेडा            ०.५ दिवसकोराडी                  २ दिवसचंद्रपूर                  १.५ दिवसनाशिक                १.५ दिवसपारस                  १.२५ दिवसपरळी                 १.७५ दिवसभुसावळ             १ दिवस

एनटीपीसी, खासगी क्षेत्रही होणार प्रभावित कोळसा संकटामुळे मौदा येथील एनटीपीसी केंद्रातील एक युनिट ठप्प आहे. खासगी क्षेत्रही प्रभावित झाले आहे. अदानीच्या तिरोडा वीज केंद्रातील उत्पादन घटले आहे. रतन इंडियाचे एक युनिट व सीजीपीएलची दोन युनिट बंद करावी लागली. दुसरीकडे गॅसआधारित उरण प्रकल्पातील एक युनिट गॅस नसल्याने बंद आहे.

बंद पडलेले युनिट कोळसा नसल्याने चंद्रपूर येथील युनिट क्रमांक ४, नाशिक येथील युनिट क्रमांक ५ व खापरखेडा येथील युनिट क्रमांक १ व २ बंद पडले आहे. कोराडीतील एक युनिट आपत्कालीन कारणांमुळे बंद आहे.   

टॅग्स :electricityवीजnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र