शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

सीएए, एनआरसीवरून आदिवासी, दुर्बलांच्या मनात भीती- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 06:50 IST

‘माझे सरकार त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे’

मुंबई : आपण जर प्रमाणपत्रे, कागदपत्रे पुरवू शकलो नाही तर आपल्याला मिळणा-या सोयीसुविधा तर जातीलच पण आपले स्वातंत्रयही हिरावून घेतले जाईल, अशी भीती सीएए,एनआरसी, एनपीआर यांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आदिवासी, दुर्बल वंचित घटक यांच्या मनात दिसत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले. मात्र, भीती वाटण्याचे कारण नाही आपले सरकार या समाजांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असे ते म्हणाले.राज्पपालांनी मराठीतून अभिभाषण दिले या बद्दल अभिनंदन करून मुख्यमंत्री म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राचे यंदाचे साठावे म्हणजे हीरकमहोत्सवी वर्ष आहे.संपूर्ण जगाला हेवा वाटेल असा राज्याचा हिरकमहोत्स्व साजरा करण्यात येणार आहे.विरोधी पक्षानेही यासाठी सरकारला साथ दयावी असे आवाहन त्यांनी केले. विरोधी पक्षाने महाविकास आघाडीच्या पहिल्या शंभर दिवसांच्या कारकिर्दीत अतिशय उत्तम सहकार्य केले आहे.पुढची पाच-पन्नास वर्षे असेच सहकार्य आम्हाला मिळत राहील असा टोलाही मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी भाजपला हाणला.कर्नाटकव्याप्त महाराष्ट्रातील मराठी बांधव हा देखील हिंदूच आहे. सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न असूनही आजही या मराठी बांधवांवर अत्याचार होत आहेत. महाविकास आघाडी सरकार हे स्थगिती सरकार असल्याची करण्यात येणारी ओरड खोटी आहे. कोणत्याही विकासकामांना आम्ही स्थगिती दिलेली नाही.आम्ही विकासाचे मारेकरी नाही. सुधीर मुनगंटीवार यांनी अनेक कामांना स्थगिती देण्यात आली आहे.आपल्याकडे त्याची कागदपत्रे असल्याचे म्हटले.मंत्री धनंजय मुंडे यांनी मुनगंटीवार यांच्या म्हणण्यावर आक्षेप घेतला. तेव्हा हवे तर यावर आपण हक्कभंग टाकतो असे मुनगंटीवार म्हणाले. मुख्यमंत्री यांनी हस्तक्षेप करत सुधीरभाऊ हक्कभंग जरूर टाका पण आधी हक्क समजून घ्या.मी स्थगिती दिलेली नाही तर केवळ प्राधान्यक्रम ठरविला असल्याचे आधीच स्पष्ट केल्याचे सांगितले.मुख्यमंत्री कार्यालय आता तालुक्यापर्यंतसर्वसामान्य जनतेला छोटया छोटया कामांसाठी मंत्रालयाचे हेलपाटे घालावे लागू नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला.आता याचा विस्तार तालुका पातळीवरही करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.मुंबईत रंगभूमीचे दालन उभारणारसमाजाच्या जडणघडणीत मराठी रंगभूमीचे योगदान मोठे आहे.याच रंगभूमीचा इतिहास उलगडून सांगण्यासाठी मुंबईत रंगभूमीचे दालन उभारण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNational Register of Citizensएनआरसीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक