चौकशीच्या भीतीनेच नारायण राणे भाजपच्या वळचणीला - विनायक राऊत यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 16:50 IST2019-02-19T16:48:21+5:302019-02-19T16:50:16+5:30

मनी लॉँडरिंगच्या प्रकरणात अटक होण्याची वेळ आली त्यावेळी राणेंनी भाजपसमोर लोटांगण का घातले, याचे त्यांनी आधी उत्तर द्यावे.

In the fear of inquiry, Narayan Rane got the BJP's assassination - Vinayak Raut | चौकशीच्या भीतीनेच नारायण राणे भाजपच्या वळचणीला - विनायक राऊत यांचा टोला

चौकशीच्या भीतीनेच नारायण राणे भाजपच्या वळचणीला - विनायक राऊत यांचा टोला

ठळक मुद्देमनी लॉँडरिंगच्या प्रकरणात अटक होण्याची वेळ आली त्यावेळी राणेंनी भाजपसमोर लोटांगण का घातले, याचे राणेंनी आधी उत्तर द्यावे राणेंवर तुरुंगात जाण्याची व त्यांच्या १९२ कंपन्यांच्या चौकशीची वेळ आल्यानेच ती थांबविण्यासाठी ते भाजपकडे धावले

रत्नागिरी - युती केल्यानंतर शिवसेनेबाबत वक्तव्य करणाऱ्या खासदार नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्याची केस सुरू आहे. ज्यावेळी मनी लॉँडरिंगच्या प्रकरणात अटक होण्याची वेळ आली त्यावेळी राणेंनी भाजपसमोर लोटांगण का घातले, याचे त्यांनी आधी उत्तर द्यावे. राणेंवर तुरुंगात जाण्याची व त्यांच्या १९२ कंपन्यांच्या चौकशीची वेळ आल्यानेच ती थांबविण्यासाठी ते भाजपकडे धावले, असा घणाघात शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांनी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

दरम्यान, शिवसेना आणि भाजपा युतीची घोषणा झाल्यानंतर नारायण राणे यांनी या युतीवर टीका केली होती.  शिवसेना हा नितिमत्ता संपलेला पक्ष असून त्यांच्या नेत्यांनी युती करून स्वत:चीच फजिती करून घेतली. भाजपा वाल्यांनी सांगितले असेल की आता सडवणार नाही. यामुळे जनतेसाठी नाही मातोश्रीच्या फायद्यासाठी युती झाल्याची टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी केली. ही मंडळी टक्केवारीवर जगणारी आहेत. कित्येक प्रकल्प मातोश्रीच्या भागीदारीवर सुरु आहेत, असा आरोपही त्यांनी केला. शिवसेना फक्त 10 जागा जिंकेल असे भाकितही राणे यांनी केले.

 
काल शिवसेना-भाजपा पक्षाने युती जाहीर केली. यावर नारायण राणे यांनी आज पहिलीच प्रतिक्रिया दिली. युतीचा फायदा दोन्ही पक्षांना होणार नाहीत. जनतेसाठी नाही मातोश्रीच्या फायद्यासाठी युती झालेली आहे. सेना भाजपबाबत जे बोलली, ते वागणे, बोलणे, ती टीका भाजपाचे कार्यकर्ते विसरणार नाहीत. एकत्र आले तरीही मने जुळणार नाहीत. काल कुठेही उत्साह नव्हता. कार्यकर्ते बाहेर उभे होते. युती झाल्यानंतर त्यांनी एकमेकांचे अभिनंदनही केले नाही. जशी युती झाली तसे कार्यकर्ते घरी गेले. तुझं माझं जमेना तुझ्याविना करमेना, अशी या युतीची अवस्था असल्याची टीका राणे यांनी केली. 

 

Web Title: In the fear of inquiry, Narayan Rane got the BJP's assassination - Vinayak Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.