हुकूमशाही शक्तींकडून भय, दहशतीवर सत्ता
By Admin | Updated: September 4, 2014 00:32 IST2014-09-04T00:32:09+5:302014-09-04T00:32:09+5:30
देशामध्ये भय, दहशत यावर आधारलेली सत्ता चालविण्याचा प्रयत्न हुकूमशाही शक्तींकडून होत आहे. याची सुरुवात नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येपासून झाली आहे.

हुकूमशाही शक्तींकडून भय, दहशतीवर सत्ता
पुणो : देशामध्ये भय, दहशत यावर आधारलेली सत्ता चालविण्याचा प्रयत्न हुकूमशाही शक्तींकडून होत आहे. याची सुरुवात नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येपासून झाली आहे. अशाच प्रकारे देशात आणि राज्यातही हल्ल्यांचे सत्र सुरू केले जात आहेत. त्याविरोधात सर्व जनतेने एकजूट होऊन संघर्ष करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी प्राणांची किंमत मोजावी लागली तरी आपण तयार आहोत, असे प्रतिपादन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अजित अभ्यंकर यांनी केले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा माकपसह इतर पुरोगामी संघटनांनी मोर्चा काढून व सभा घेऊन निषेध केला. या वेळी किरण मोघे, शुभा शमीम, सतीश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, मधुकर निलफराके, विठ्ठल सातव, सुभाष वारे, किशोर ढमाले, रजिया पटेल, नितीन पवार, मोलकरीण संघटनेच्या मेधा थत्ते, रंगमंच अभिनेत्री सुषमा देशपांडे, ‘लोकायत’च्या अलका जोशी आदी उपस्थित होते.
निलफराके म्हणाले, ‘‘पोलीस खाते तितके सक्षमपणो काम करीत नसल्याने आपल्याला काहीच होणार नाही, या विश्वासाने हल्लेकर्ते अशा प्रकारे कृत्य करत आहेत. त्यासाठी नाही रे वर्गाने एकत्र येऊन काम करणो आवश्यक आहे.
या वेळी बाबा आढाव यांनी पोलीस आयुक्तांना भेटण्याची सूचना केली. त्यानुसार त्यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ तयार करण्यात येणार असून, 4 सप्टेंबर रोजी त्यांना भेटण्यास जाणार असल्याचेही या सभेत सूचित करण्यात आले.
भ्याड हल्ल्याचा निषेध, संघ परिवाराच्या हुकूमशाहीचा निषेध, नरेंद्र मोदी होश में आओ, होश में आकर काम करो’ अशा घोषणा देण्यात आल्या. या हल्ल्यांना उत्तर हिंसेने नाही; पण आक्रमकपणो देण्याबाबत उपस्थितांनी घोषणा दिल्या. (प्रतिनिधी)
पोलीस आयुक्तांकडे सुरक्षेची मागणी
पुरोगामी विचारांचा लढा अशा हल्ल्यांनी घाबरणार नाही; उलट
जोमाने सुरू राहील, असा विश्वास व्यक्त करत या हल्ल्याविरोधात आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून
एक शिष्टमंडळ पोलीस
आयुक्तांकडे सुरक्षेच्या मागणीसाठी जाणार आहे.