खोब्रागडे रिपब्लिकन पक्षात तर, माणिक मुंडे शिवसेनेत

By Admin | Updated: September 3, 2014 02:58 IST2014-09-03T02:58:16+5:302014-09-03T02:58:16+5:30

निवृत्त सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी मंगळवारी रिपब्लिकन पार्टीमध्ये तर निवृत्त सनदी अधिकारी माणिक मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

In favor of Khobragade Republican, Manik Munde Shivsenaet | खोब्रागडे रिपब्लिकन पक्षात तर, माणिक मुंडे शिवसेनेत

खोब्रागडे रिपब्लिकन पक्षात तर, माणिक मुंडे शिवसेनेत

मुंबई : निवृत्त सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी मंगळवारी रिपब्लिकन पार्टीमध्ये तर निवृत्त सनदी अधिकारी माणिक मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
रिपब्लिकन पार्टीचे नेते रामदास आठवले यांच्या उपस्थितीत खोब्रागडे यांनी पक्ष प्रवेश केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील व्यापक रिपाइं तसेच महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेला सत्तेमध्ये सहभाग मिळवून देण्याचे सामथ्र्य आठवले यांच्या नेतृत्वात असल्याने आपण याच पक्षात प्रवेश घेतल्याचे खोब्रागडे यांनी सांगितले. पक्षाने आदेश दिला तर विधानसभा निवडणूक लढवण्याची तायरीही त्यांनी दर्शविली. आपली कन्या देवयानी हिच्या प्रकरणात काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेबाबत खोब्रागडे यांनी नापसंती व्यक्त केली.
निवृत्त सनदी अधिकारी माणिक मुंडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेतील गटनेते सुभाष देसाई, सचिव खासदार अनिल 
देसाई यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. 
याखेरीज काँग्रेसच्या माजी मंत्री डॉ. शालिनी 
बोरसे यांच्या कन्या डॉ. माधुरी बोरसे व जावई डॉ. विपुल बाफना यांनीही कार्यकत्र्यासह शिवसेनेत प्रवेश केला. (विशेष प्रतिनिधी)
 
खोब्रागडेंचा संताप
आदर्श घोटाळ्यात नाव जोडले गेल्याने खोब्रागडे यांना महायुतीतून तिकीट मिळणार का, असा सवाल विचारण्यात आल्यावर खोब्रागडे भलतेच संतापले. ‘असा प्रश्न विचारण्याचा पत्रकारांना अधिकारच काय?’ असे प्रतिसवाल त्यांनी केला. मात्र काही नेत्यांनी त्यांना शांत केल्यानंतर, सीबीआयने सादर केलेल्या चाजर्शीटमध्ये आपले नाव नसून चौकशी आयोगाच्या अहवालात आपण निदरेष असल्याचा दावा त्यांनी केला.

 

Web Title: In favor of Khobragade Republican, Manik Munde Shivsenaet