दरवाजा उशिरा उघडला म्हणून मुलाने केला वडिलांचा खून
By Admin | Updated: May 8, 2017 10:03 IST2017-05-08T10:03:58+5:302017-05-08T10:03:58+5:30
मुलाने वडिलांचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरच्या शाहूकॉलनी विक्रमनगर येथे घडली आहे.

दरवाजा उशिरा उघडला म्हणून मुलाने केला वडिलांचा खून
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 8 - घराचा दरवाजा लवकर उघडला नाही म्हणून संतापलेल्या मुलाने वडिलांचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरच्या शाहूकॉलनी विक्रमनगर येथे घडली आहे. पिरसाहब मुल्ला (वय 55) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
रफिक मुल्ला (वय 27) याला वडिलांच्या हत्ये प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. रफिक हा रोज राञी दारू पिऊन घरी उशिरा यायचा.
त्याच्या या रोजच्या वागण्याला कंटाळून मृत पिरसाहब यांनी घराचा दरवाजा लवकर उघडला नाही. त्याचा रागातून त्याने त्यान वडिलांच्या पोटात, छातीवर सपासप वार करुन त्यांची हत्या केली.