शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Fathers Day: "बाबा, मला बिस्कीट नको, चॉकलेट नको, फक्त तुम्ही लवकर घरी या"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 13:00 IST

Happy Fathers Day: फादर्स डे’निमित्त शहरातील सैनिकांच्या मुलांनी आपल्या पित्याला ‘लोकमत’द्वारे खास संदेश दिला.

प्राची पाटील,लोकमत न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर: ‘मला माहितेय, तुम्ही देशासाठी मोठे काम करत आहात. पण, बाबा, तुम्ही कधी येणार आहात? लवकर आम्हाला भेटायला या. मला बिस्कीट नको, चॉकलेट नको, मला फक्त तुम्ही पाहिजे’. ‘फादर्स डे’निमित्त शहरातील सैनिकांच्या मुलांनी आपल्या पित्याला ‘लोकमत’द्वारे खास संदेश दिला. आपल्या भावना व्यक्त करताना ही चिमुकली मुले भावुक झाल्याचेही पाहायला मिळाली.

प्रत्येकाच्या आयुष्याचा आधारस्तंभ असतो तोआई घराचे मांगल्य असते, तर बाप घराचे अस्तित्व. प्रत्येकाच्या आयुष्यातला आधारस्तंभ असतो बाबा. पण, त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त करण्याची वेळ फार कमी येते. सीमेवर लढणारा सैनिक बाबा तर ग्रेटच. आपल्या मुलांपासून दूर-दूर राहताना त्याचाही जीव तीळतीळ तुटतो. पण, आपल्या भावनांना आवर घालत सीमेवर तो केवळ देशासाठी प्राणपणाने लढतो. त्यामुळेच आपला बाबा सैनिक असल्याचे त्यांची मुले अभिमानाने सांगतात.

ते जाताना खूप रडू येते लेह-लडाख सीमेवर तैनात असलेले जवान समाधान आहेर यांची दुसरीत शिकणारी मुलगी शिवकन्या म्हणाली, ‘माझे पप्पा सैनिक आहेत, याचा मला खूप अभिमान वाटतो. ते जेव्हा सुटीवर येतात, तेव्हा आम्ही खूप गप्पा मारतो, खेळतो, मजा करतो. पण, जेव्हा ते इथून जातात तेव्हा खूप रडू येते. माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे.’

चॉकलेट घेऊन लवकर या जम्मूमध्ये तैनात जवान प्रवीण साळुंके यांचा चार वर्षांचा मुलगा युवराज निरागसपणे म्हणाला, माझे बाबा फौजी आहेत. ते वाईट लोकांसोबत युद्ध करतात. बाबा, मला चॉकलेट घेऊन तुम्ही लवकर या.

लवकर मला घ्यायला या सध्या कोलकात्यामधील पानागड येथे तैनात असलेल्या राजू साळुंके यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा शिवांश म्हणाला, ‘मला बाबांची खूप आठवण येते. ते देशाची सेवा करतात. ते मला फोनवर म्हणाले होते की, मी तुला घ्यायला येईन. पण, बाबा अजून आलेच नाहीत. मला चॉकलेट नको, पण तुम्ही बाबाला सांगा की मला लवकर घ्यायला या. मला त्याच्याबरोबरच जायचे आहे.

टॅग्स :Father's Dayजागतिक पितृदिनAurangabadऔरंगाबादMaharashtraमहाराष्ट्र