५०० रुपयांसाठी पित्याचा खून

By Admin | Updated: February 7, 2017 04:55 IST2017-02-07T04:55:32+5:302017-02-07T04:55:32+5:30

शेतातील विकलेल्या झाडाचे ५०० रुपये न दिल्याने संतापलेल्या मुलाने वडिलांच्या डोक्यावर काठीने मारून त्यांना ठार मारल्याची घटना रविवारी घडली

Father's blood for 500 rupees | ५०० रुपयांसाठी पित्याचा खून

५०० रुपयांसाठी पित्याचा खून

गोंदिया : शेतातील विकलेल्या झाडाचे ५०० रुपये न दिल्याने संतापलेल्या मुलाने वडिलांच्या डोक्यावर काठीने मारून त्यांना ठार मारल्याची घटना रविवारी घडली. डोमनू मेश्राम (७०) असे मृताचे नाव आहे. शनिवारी डोमनू यांनी शेतातील एक झाड ५०० रुपयांत विकले. त्यावरून त्यांचा रेवतीलाल (४५) याच्याशी त्यांचा वाद झाला.त्या झाडाचे ५०० रुपये मला हवेत, अशी मागणी रेवतीलालने केली. मात्र डोमनू यांनी ते देण्यास नकार दिला. याच्या रागातून वडील झोपेत असतानाच रेवतीलालने त्यांना ठार केले. पोलिसांनी रेवतीलालविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Father's blood for 500 rupees