पित्यानेच केला पत्नीसह मुलांवर कु-हाडीने वार, १ मुलगी ठार

By Admin | Updated: March 12, 2016 08:48 IST2016-03-12T08:48:16+5:302016-03-12T08:48:32+5:30

बुलडाण्याजवळील कासारखेड येथे एका इसमाने आपल्या पत्नीसह तीन मुलांवर कु-हाडीने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून १ मुलगी ठार झाली आहे.

Father with wife and wife, 1 girl killed with bone and bone | पित्यानेच केला पत्नीसह मुलांवर कु-हाडीने वार, १ मुलगी ठार

पित्यानेच केला पत्नीसह मुलांवर कु-हाडीने वार, १ मुलगी ठार

>ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. १२ - बुलडाण्याजवळील कासारखेड येथे एका इसमाने आपल्या पत्नीसह तीन मुलांवर कु-हाडीने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेत एका मुलीचा मृत्यू झाला आहे.  समाधान अंभोरे असे आरोपीचे नाव असून काल मध्यरात्री अडीच ते तीनच्या सुमारास ही घटना घडली. 
समाधान अंभोरेने मध्यरात्री झोपेत असलेली त्याची पत्नी, दोन मुली व एक मुलगा अशा चौघांवर कु-हाडीने वार करत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. ते चौघेही या घटनेत जबर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र अंभोरेच्या गंभीर जखमी झालेल्या १५ वर्षीय मुलीचा या हल्ल्यात मृत्यू झाला तर इतर तिघे रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. 
दरम्यान आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र त्याने हे कृत्य का केले याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Web Title: Father with wife and wife, 1 girl killed with bone and bone