शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

मुलाला शिक्षणासाठी अमेरिकेत पाठविण्यासाठी वडीलांनी विकली दोन एकर शेती

By admin | Updated: August 18, 2016 17:03 IST

अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नुकताच रूजू झालेल्या युवकाने आपला पहिला पगार गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिला.

नितीन गव्हाळे

अकोला, दि. 18 : घरची परिस्थिती जेमतेम. वडील शेतकरी. पाच ते सहा एकर शेती. त्यातही कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ. पिक घरात येईल. याची श्वासती नाही. वडीलांनी अशाही परिस्थितीतही आपल्याला शिकविले. संघर्ष करीत, अडथळे पार करावे लागले. परंतु माझ्यासारखा असा प्रसंग कोणावर येऊ नये. पैशांअभावी कोणत्याही गरीब विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये या दृष्टीकोनातून अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नुकताच रूजू झालेल्या युवकाने आपला पहिला पगार गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिला.

प्रवीण दादाराव नागरे(२३) हे त्याचे नाव.तो बोरगाव मंजू येथे राहणारा. अल्पश: शेतीतील उत्पन्नातून वडीलांनी त्याला शिकविले. मुलातील गुणवत्ता पाहून वडीलांनी कधी हात आखडता घेतला नाही. प्रसंगी कर्ज काढून, उसने पैसे घेऊन त्याला शिकविले. वडीलांच्या कष्टाचे मुलाने सार्थक केले. मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर झाला आणि आज अमेरिकेतील बोस्टन शहरात गलेलठ्ठ पगारावर काम करतो. प्रवीणचे प्राथमिक शिक्षण जि.प. शाळेत झाले. पुढील दहावीपर्यंचे शिक्षण परशुराम नाईक विद्यालयात झाले. प्रवीण अभ्यासात तसा सर्वसाधारण. विज्ञान प्रदर्शनीमध्ये त्याच्यातील गुणवत्ता विज्ञान शिक्षक विजय पजई यांनी हेरली. त्यांनी त्याला मार्गदर्शन केले. त्याची राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनीसाठी निवड झाली. थोर शास्त्रज्ञ डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांनीही त्याच्या विज्ञान प्रकल्पाचे कौतुक केले.

पुढे अब्दुल कलाम यांच्या कार्यशाळेसाठी निवडक विद्यार्थ्यांमधून प्रवीणची निवड झाली. अब्दुल कलामांचे भाषण ऐकून जीवनात काही वेगळे करण्याची उर्मी त्याच्यात निर्माण झाली. पुढे प्रवीणने पुणे येथे बीई केले. तो सॉफ्टवेअर इंजिनियर झाला. अमेरिकेतील ब्रिगहम्टन येथे एमईसाठी त्याची निवड झाली. परंतु वडीलांकडे त्याला अमेरिकेत पाठविण्याइतपत पैसे नव्हते. वडीलांनी मागचापुढचा विचार न करता थेट दोन एकर शेत विकले आणि प्रवीणला अमेरिकेला पाठविला. तेथे एमई पूर्ण केल्यानंतर जुलैमध्ये त्याला बोस्टन शहरातील कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नोकरी मिळाली. महिन्याला पाच लाख सत्तर हजार रूपये पगार मिळाला. आपल्यावर जी परिस्थिती ओढवली. ती इतर गरीब विद्यार्थ्यांवर ओढावू नये. यासाठी त्याने वडीलांना पगाराचा धनादेश पाठविला आणि ५0 हजार १0१ रूपयांची मदत त्याने परशुराम नाईक विद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्यास वडीलांना सांगितले. त्यानुसार वडीलांनी स्वातंत्र्य दिनी धनादेश संस्थेच्या सुपूर्द केला. प्रवीणची गरीब विद्यार्थ्यांप्रती तळमळ प्रेरणादायी आहे.

गरजु विद्यार्थ्यांना लागेल तेवढी मदत देण्याची तयारीअनेकजण विपरीत परिस्थितीत संघर्ष करतात. परंतु दिवस पालटले की मागचे सगळे विसरून जातात. पैशांची उर्मी दाटून येते. मी, माझे कुटूंब आणि माझा पैसा. याशिवाय दुसरे कोणतेच ध्येय व्यक्तीसमोर नसते. परंतु प्रवीणने घरची आर्थिक परिस्थिती हलाखिची असतानाही पहिल्या पगारातील थोडी थोडकी नव्हे ५0 हजार रूपयांची मदत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिली. एवढेच नाहीतर कोणत्या गरजु परंतु गुणवंत विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये. यासाठी त्याने लागेल तेवढी आर्थिक मदत देण्याची तयारी दाखविली आहे.