बापाने मुलीवर केला वर्षभर बलात्कार

By Admin | Updated: February 16, 2015 03:35 IST2015-02-16T03:35:12+5:302015-02-16T03:35:12+5:30

स्वत:च्या पोटच्या मुलीवर वर्षभर बलात्कार करून तिला गरोदर ठेवणाऱ्या नराधम बापाला शहर पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली

Father raped the girl for a year | बापाने मुलीवर केला वर्षभर बलात्कार

बापाने मुलीवर केला वर्षभर बलात्कार

महाड : स्वत:च्या पोटच्या मुलीवर वर्षभर बलात्कार करून तिला गरोदर ठेवणाऱ्या नराधम बापाला शहर पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. घरात कोंडून ठेवलेल्या या पीडित मुलीसह तिच्या आईची सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी सुटका करून शहर पोलीस ठाण्यात आणल्याने या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला. महाड तालुक्यातील किंजळोली मूळगाव येथे ही दुर्दैवी घटना घडली.
गेल्या वर्षापासून आरोपी अठरा वर्षीय मुलीवर सातत्याने बलात्कार करीत होता. याबाबत कुणाला सांगितले तर तिच्यासह त्याच्या पत्नीलाही तो जिवे मारणाची धमकी देत होता. बापाने केलेल्या अत्याचारातून ती मुलगी गरोदर राहिली. आपले बिंग फुटेल म्हणून त्याने मुलगी व त्याच्या पत्नीला घरात कोंडून ठेवले होते. याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांना समजताच त्यांनी तिची सुटका केली आणि पोलिसांत तक्रार केली. यावेळी तिने बापाने केलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली.
दरम्यान, पीडित मुलीला शनिवारी रात्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केली असता तिने मुलाला जन्म दिला आहे. या प्रकरणाचा पोलीस उपनिरीक्षक डी. के. जाधव पुढील तपास करीत असून, आरोपीला २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. दरम्यान, नाती आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Father raped the girl for a year