शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs NZ ODI: भारताचा संघ जाहीर; अय्यर IN; ऋतुराज, तिलक OUT, बुमराह-पांड्याला विश्रांती
2
Donald Trump : "आमच्या कंपन्यांना बाहेर काढलं..."; व्हेनेझुएला एअर स्ट्राईकनंतर ट्रम्प यांचा जुना Video व्हायरल
3
"ते तर आता 'लीडर ऑफ पर्यटन'"; राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावर भाजपाची बोचरी टीका
4
टीम इंडियासाठी 'गुड न्यूज'! Shreyas Iyerला 'कमबॅक'साठी BCCIची मान्यता, 'या' तारखेला खेळणार
5
बांगलादेशात हिंदूंचं जगणं कठीण! एकाला खांबाला बांधून अमानुष मारहाण, प्रकृती चिंतानजक
6
Tarot Card: स्वामींचं नाव घेत एक कार्ड निवडा आणि पुढच्या आठवड्याचे साप्ताहिक भविष्य जाणून घ्या
7
हिवाळ्यात नारळ पाणी प्यावं की नाही? लोक हमखास करतात चूक, विसरु नका ‘ही’ योग्य वेळ
8
सोलापूर: निवडणुका बिनविरोध करण्यासाठीच 'तो' मर्डर! प्रणिती शिंदेंचा भाजपावर गंभीर आरोप
9
व्हेनेझुएलात युद्धाचा भडका; अमेरिकेने राष्ट्राध्यक्षांना पत्नीसह घेतले ताब्यात,ख्रिसमसलाच होणार होती कारवाई
10
अभिनेते आशिष विद्यार्थी यांचा अपघात, भरधाव दुचाकीस्वाराने दिली धडक; पत्नीही जखमी
11
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या मुली असतात निसर्गतः देखण्या आणि आकर्षक
12
Nashik: शिंदेसेनेतील अंतर्गत वाद उफळला, उमेदवाराचा पत्नीसह आत्महत्येचा इशारा, नेमकं प्रकरण काय?
13
सोन्यामध्ये ₹१९९९ ची घसरण, चांदीही चमकही झाली कमी; पाहा कशी होती आठवड्याची सराफा बाजाराची स्थिती
14
मोठी बातमी! बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांच्या विरोधात राज ठाकरेंकडे पुरावे; प्रकरण कोर्टात जाणार
15
99th Marathi Sahitya Sammelan: संमेलनस्थळी कार्याध्यक्षांना फासले काळे, संशयित पोलिसांच्या ताब्यात-video
16
Silver Price Today: ६०% स्वस्त होणार चांदी; जाणून घ्या का म्हणताहेत एक्सपर्ट्स असं?
17
Virat Kohli पुन्हा एकदा कसोटी क्रिकेट खेळताना दिसू शकतो! Gautam Gambhir चे नाव घेत कुणी केला मोठा दावा?
18
ड्रीमी प्रपोजल! क्रिती सनॉनच्या बहिणीचा झाला साखरपुडा, प्रसिद्ध गायकासोबत बांधणार लग्नगाठ
19
चुकीच्या UPI आयडीवर पैसे पाठवले गेले? घाबरू नका, 'या' सोप्या पद्धतीने मिळवा पैसे परत
20
Nashik Municipal Election 2026 : धावपळ, उत्कंठा अन् रंगलेले माघारी नाट्य! अपक्षांच्या मनधरणीसाठी मोठी कसरत
Daily Top 2Weekly Top 5

जीवाची बाजी लावली; महापुरातून १५० जनावरांना बाप-लेकाने काढले सुखरूप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 12:31 IST

सीना नदीला आलेल्या महापुरामुळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांनी वेळप्रसंगी आपल्या जनावरांना  जागेवरच सोडून स्थलांतर केले.

कुर्डूवाडी (जि. सोलापूर) : सीना नदीला आलेल्या महापुरामुळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांनी वेळप्रसंगी आपल्या जनावरांना  जागेवरच सोडून स्थलांतर केले. मात्र, केवड (ता. माढा) येथील  शाबू चव्हाण व मदन चव्हाण या बापलेकाने नदीपात्राजवळील पाच किमी अंतरावरील पुरात बुडालेल्या १५० जनावरांना वाचवण्यात यश मिळवले.

जागेवर बांधलेल्या जनावरांना व वाहत आलेल्या जनावरांना सोडून  दोघांनी पाणी नसलेल्या उंच ठिकाणच्या वस्तीवर आणून बांधले. पूर कालावधीत स्वतः दोन दिवस उपाशी राहूनदेखील जनावरांना मात्र उसाचा चारा भरविल्याचे समोर आले. परिसरात निर्माण झालेल्या महापुराच्या भयंकर संकटात शेकडो जनावरे दगावली. मात्र, केवड (ता. माढा) येथील मुसळे वस्तीवरील या बापलेकाने अशा काळात केलेल्या कार्याचे गावात  कौतुक होत आहे. 

उसाचा चारा भरवून जगविले नदीला पूर आल्यानंतर नदीपात्रातील ओरडणारी जनावरे पाहू वाटेनासे झाली होती. यामुळे ती सोडवून आणत मी चोहोबाजूने पुराचे पाणी असताना देखील पाणी नसलेल्या उंच उंच ठिकाणी वारंवार घेऊन जात त्यांना उसाचा चारा भरवीत पुरातून वाचवण्याचे काम केले आहे. याने मला खूप समाधान लाभले.  मदन चव्हाण, शेतकरी, केवड

English
हिंदी सारांश
Web Title : Father-son duo risks lives, saves 150 animals from Maharashtra floods.

Web Summary : In Kurduwadi, a father and son, Shabu and Madan Chavan, bravely rescued 150 animals stranded in the Sina River flood. They relocated the animals to higher ground, prioritizing their safety even while facing hunger themselves. Their selfless act is being praised.
टॅग्स :Solapurसोलापूरfloodपूर