राष्ट्रवादीच्या माजी आमदारावर गोळीबार
By Admin | Updated: August 19, 2016 17:28 IST2016-08-19T17:28:26+5:302016-08-19T17:28:26+5:30
कुर्ला येथील राष्ट्रवादीचे माजी आमदार मिलिंद कांबळे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. सुदैवाने मिलिंद कांबळे बचावले असून चालक जखमी झाला आहे.

राष्ट्रवादीच्या माजी आमदारावर गोळीबार
>- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - कुर्ला येथील राष्ट्रवादीचे माजी आमदार मिलिंद कांबळे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. कुर्ला नेहरूनगर येथील प्रगती हाऊसिंग सोसायटीजवळ हा गोळीबार करण्यात आला. अज्ञात व्यक्तीने फायरिंग असून सुदैवाने मिलिंद कांबळे बचावले आहेत. मात्र त्यांचा चालक गंभीर जखमी झाला आहे. फायरिंग झाली तेव्हा मिलिंद कांबळे साईटवर उपास्थित होते. फायरिंगमध्ये मिलिंद कांबळे यांचा चालक अनिल भिसे जखमी झाला आहे. त्याला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं आहे.