मुंबई गोवा हायवेवर भीषण अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2016 10:36 IST2016-06-26T10:36:53+5:302016-06-26T10:36:53+5:30
मुंबई गोवा हायवे वर पेण जवळ मिनीडोअर व ट्रेलर मध्ये झालेल्या भीषण अपघातात १ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण २ जण गंभीर जखमी झाले आहेत.

मुंबई गोवा हायवेवर भीषण अपघात
style="text-align: justify;">
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ : मुंबई गोवा हायवे वर पेण जवळ मिनीडोअर व ट्रेलर मध्ये झालेल्या भीषण अपघातात १ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण २ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना झटपट सेवा देण्यासाठी कल्पेश ठाकूर यांचे शर्थीचे प्रयन्त सुरु आहेत. या अपघातामुळे मुंबई- गोवामहामार्गावर ट्रॅफिक जाम झाली आहे.
आज सकाळी ७:३० वाजता पेण जवळील हमरापुर ते ईरवाडी दरम्यान हा अपघात झाला आहे. यामध्ये ट्रेलर क्रमांक MH43 Y 1171 व मिनिडोर MH06 J 1845 यांचे नुकसान झाले आहे. या अपघातात सचिन पाटील यांचा मृत्यू झाला आहे. ते पेण जवळील कामार्ली येथील रहवासी आहेत तर खारसापोली बेडे येथिल प्रसाद पाटील आणि कामार्लीचे सुरेश मुसळे गंभीर जखमी झाले आहेत.