शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 18:58 IST

Fastag Annual Pass for Maharashtra: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलेल्या घोषणेनुसार केवळ राष्ट्रीय महामार्गच या योजनेत येणार आहेत. एक्स्प्रेसवे, अटल सेतू हे राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात.

फास्टॅगचा वार्षिक पास लाँच करण्यात येणार आहे. येत्या १५ ऑगस्टपासून टोला नाक्यांवरून पास होण्यासाठी ३००० रुपयांचा पास दिला जाणार आहे. याद्वारे तुम्ही केवळ राष्ट्रीय महामार्ग जे एनएचएआयच्या अखत्यारीत येतात त्यावरूनच २०० वेळा टोल क्रॉस करू शकणार आहात. परंतू, महाराष्ट्राच्या वेगवान दळणवळणासाठी महत्वाचे असलेले मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतू या पासमध्ये येणार नाहीत. म्हणजेच वाहनधारकांना या मार्गांवरचा टोल हा द्यावाच लागणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या मार्गांसाठी देखील पास लागू करावा अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. 

Fastag New Rules : कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलेल्या घोषणेनुसार केवळ राष्ट्रीय महामार्गच या योजनेत येणार आहेत. एक्स्प्रेसवे, अटल सेतू हे राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात. एमएसआरडीसी ही समृद्धी महामार्गासह या महामार्गांची देखरेख करते. यामुळे या महामार्गांवर भरमसाठ टोल द्यावाच लागणार आहे. राष्ट्रीय महामार्गांच्या नावाची सुरुवात NH अशी होते तर राज्याच्या महामार्गांची सुरुवात ही MH MSH अशी होते. यामुळे एनएच आणि पुढे त्या महामार्गाचा नंबर असलेल्या महामार्गांवरच टोल पास वापरता येणार आहे. 

मुंबई पुणे असा प्रवास करताना जुन्या हायवेवरून प्रवास केला तरच टोल पास वापरता येणार आहे. त्याला पर्याय म्हणून महाराष्ट्र सरकारने एक्स्प्रेस हायवे बांधला होता. यामुळे जे पास घेण्याचा विचार करत आहेत त्यांनी या गोष्टींचा जरूर विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

हा पास कोणासाठी?हा पास जे लोक टोलबुथवरून किंवा टोलच्या रस्त्यावरून वारंवार प्रवास करतात त्यांच्यासाठी आहे. कधीतरी ये-जा करत असाल आणि जर तुमचा टोलवरील खर्चच जर वर्षाला ३००० रुपयांपेक्षा कमी असेल तर चुकूनसुद्धा तुम्ही या पासच्या वाट्याला जाऊ नका.

जयंत पाटील काय म्हणाले...जयंत पाटील यांनी नितीन गडकरी यांच्या या टोल पासचे स्वागत केले आहे. तसेच राज्य सरकारकडे  पुणे- मुंबई एक्सप्रेसवे अटल सेतू सह राज्याच्या महामार्गांवरही वार्षिक पासची मागणी केली आहे. 

 

टॅग्स :Fastagफास्टॅगMumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वेSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गNitin Gadkariनितीन गडकरी