शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
2
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
3
अफगाणिस्तानात भूकंप आला त्यात फक्त पुरुषांना वाचवलं, महिलांना नाही; कारण ऐकून धक्का बसेल
4
शाब्बास हरभजन सिंग!! पूरग्रस्तांसाठी दिल्या ११ बोटी, ३ रूग्णवाहिका; ५० लाखांचा निधीही जमवला
5
सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
6
बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video
7
सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या
8
साखरपुडा झाल्यानंतर प्राजक्ता गायकवाड तिरुपती बालाजीच्या दर्शनाला, म्हणाली "खूप वर्षांपासून"
9
Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी
10
"आता या लग्नाच्या हॉलमध्ये आग लागो, काहीही होवो पण....", लग्नाच्या दिवशी उमेश प्रियाला असं का म्हणाला?
11
Sangli Murder: तिसंगी येथे युवकाचा दगडाने ठेचून खून, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
12
निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी कुठे, कशी, कधीपासून गुंतवणूक करावी?
13
महिंद्राची थार १.३५ लाखांनी स्वस्त झाली; स्कॉर्पिओची किंमत १.४५, XUV 3XO १.५६ लाखांनी तुटली...
14
Maratha Reservation : सरकारच्या GR विरोधातच मंत्री छगन भुजबळ कोर्टात जाणार; मराठा आरक्षणावरून OBC नेते आक्रमक
15
उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक; संख्याबळ कोणाकडे? कोणाचा कोणाला पाठिंबा? जाणून घ्या...
16
अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढ; निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांची मोठी घोषणा
17
World Record Broken! ४०० पारच्या लढाईत इंग्लंडनं साधला टीम इंडियाचा विश्व विक्रम मोडण्याचा डाव
18
अवघ्या १५० रुपयांत मिळतं लोकेशन, तर ६०० रुपयांत फोन रेकॉर्ड! पाकिस्तानी मंत्र्यांची सुरक्षा धोक्यात 
19
१५ वर्षीय मुलगी पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात, भेटायला निघाली पण...; चॅटमधून खळबळजनक खुलासा
20
प्रयत्नांती परमेश्वर! लेक नापास पण आई झाली पास; वयाच्या पन्नाशीत लॉ कॉलेज प्रवेश परीक्षा क्रॅक

एक हजार गावांत तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: September 11, 2015 03:09 IST

मराठवाड्यातील एक हजारांहून अधिक गावे आणि २० मोठ्या शहरांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. विभागात सुमारे चौदाशे टँकर धावत असून, १० मोठी धरणे आणि ३ बंधाऱ्यांमध्ये

औरंगाबाद : मराठवाड्यातील एक हजारांहून अधिक गावे आणि २० मोठ्या शहरांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. विभागात सुमारे चौदाशे टँकर धावत असून, १० मोठी धरणे आणि ३ बंधाऱ्यांमध्ये मिळून ८.५ टक्के इतकाच पाणीसाठी उपलब्ध आहे.जायकवाडीसारख्या मोठ्या धरणात केवळ ४.१३ टक्के तर, नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरणात ७.७ टक्के एवढेच पाणी आहे. अनेक प्रकल्प कोरडेठाक आहेत. त्यामुळे पुढील वर्षापर्यंत पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. यंदा जून अािण जुलै महिन्यांत संपूर्ण मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्याने आठही जिल्ह्यांत जुलै महिन्यापासूनच पाणीटंचाई आहे. सप्टेंबर महिन्यात औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत चार दिवस बरा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला. पण यामुळे पाण्याचे संकट मात्र टळलेले नाही. औरंगाबाद शहरातही चार दिवसांआड पाणी येत आहे. जिल्ह्यातील १२२ गावांत तीव्र पाणीटंचाई असून, १५३ टँकर चालू आहेत. अनेक प्रकल्प कोरडेठाकचार दिवसांपासून काही जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला असला तरी अनेक पाझर तलाव आणि मध्यम प्रकल्प कोरडेठाक आहेत. सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा (बीड) निम्न तेरणा (उस्मानाबाद) या चार धरणांत सद्य:स्थितीला उपयुक्त जलसाठा शून्य असून, सीना कोळेगाव (उस्मानाबाद) या बंधाऱ्यातही शून्य टक्के उपयुक्त जलसाठा आहे. विष्णुपुरी धरणात २० दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे.बीड जिल्ह्यात भीषण स्थितीअवर्षणप्रवण असलेल्या बीड जिल्ह्यात मागील तीन-चार वर्षांपासून पाण्याची मोठी कमतरता होती. यंदा मात्र स्थिती भीषण आहे. या जिल्ह्यात सर्वाधिक ५९२ टँकर चालू करण्यात आले आहेत. तरीही अनेक गावे अद्यापही तहानलेली आहेत.