शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

वेगवान 'टॅल्गो' ट्रेन मुंबईत दाखल

By admin | Updated: August 2, 2016 16:59 IST

ताशी १३0 किलोमीटच्या वेगाने धावणा-या 'टॅल्गो' ट्रेनची यशस्वी चाचणी घेण्यात आली असून त्यामुळे मुंबई ते दिल्लीदरम्यानच्या रेल्वे प्रवासाचा कालावधी लवकरच काही तासांनी कमी होणार आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २ -  मुंबई ते दिल्ली प्रवास अंतर कमी व्हावे आणि उत्तम सुविधा प्रवाशांना मिळावी यासाठी ‘टॅल्गो’सारखी वेगवान ट्रेन रेल्वे मंत्रालयाने चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन शहरादरम्यान टॅल्गो ट्रेनची पहिली चाचणी मंगळवारी यशस्वीरित्या पार पडली. पावसाळ्यातील अनेक अडथळे पार करत ही ट्रेन मंगळवारी सकाळी ११.३५ च्या सुमारास मुंबई सेन्ट्रल येथे दाखल झाली. या ट्रेनच्या मुंबई ते दिल्ली दरम्यान आणखी तीन चाचण्या केल्या जाणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे चाचणीसाठी ३२ वर्ष जुनी असलेली टॅल्गो ट्रॅन वापरण्यात आली. 

 सोमवारी रात्री आठच्या सुमारास दिल्ली येथून नऊ डबा ‘टॅल्गो’ट्रेन मुंबईसाठी रवाना झाली. ही ट्रेन सकाळी दहाच्या सुमारास पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेन्ट्रल स्थानकात पोहोचणे अपेक्षित होते. मात्र गुजरातमध्ये पडणाºया मुसळधार पावसाचा या ट्रेनला फटका बसला आणि ही ट्रेन मुंबईत दीड तास उशिराने पोहोचली. दिल्ली ते सुरतपर्यंत पोहोचण्यास पावसाचा अडथळा निर्माण झाला. त्यामुळे ट्रेनचा वेग कमी ठेवण्यात आल्याने ती मुंबईत पोहोचण्यास उशिर झाल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. दिल्ली ते मुंबई अशी पहिली चाचणी ही इलेक्ट्रीकल इंजिन लावून ताशी् १३0 च्या वेगाने घेण्यात आली आणि ही चाचणी यशस्वी झाली. महत्वाची बाब म्हणजे सुपरफास्ट राजधानीपेक्षा तीन तास उशिराने निघूनही टॅल्गो ट्रेन मुंबईत वेळेवर दाखल झाली. दिल्ली ते मुंबई असा प्रवास करताना या ट्रेनला अनेक स्थानकांवर थांबाही देण्यात आला. 
 
 

 

 

या ट्रेनच्या आणखी तीन चाचण्या घेण्यात येतील. दुसरी चाचणीही ताशी १३0 किलोमीटरच्या वेगाने होईल. त्यानंतर तीसरी चाचणी ताशी १४0 तर चौथी चाचणी ही ताशी १५0 किमीच्या वेगाने दिल्ली ते मुंबई दरम्यान घेण्यात येईल. टॅल्गो ट्रेनचा वेग हा जास्तीत जास्त ताशी २00 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. मात्र भारतीय रेल्वेच्या ट्रॅकची क्षमता पाहता प्रथम ताशी १५0 आणि त्यानंतर जास्तीत जास्त १८0 किमीपर्यंत वेग ठेवण्याचा प्रयत्न असेल. रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, टॅल्गोची पहिली चाचणी यशस्वी झाली. आणखी काही चाचण्या करण्यात येतील. चाचणी करण्यात आलेली ट्रेन ही ३२ वर्षीय जुनी आहे. तर अशाप्रकारचे तंत्रज्ञान हे ७0 वर्षापूर्वीचे आहे. भारतीय रेल्वेत हे तंत्रज्ञान आता येत आहे. सध्या चाचणीपुरता ही ट्रेन वापरण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

ही ट्रेन २७ मार्च २0१६ रोजी समुद्रमार्गे भारतात दाखल झाली आणि त्यानंतर बरेली ते मोरादाबाद येथे पहिली चाचणी आणि दुसरी चाचणी उत्तर मध्य रेल्वेच्या मथुरा ते पलवल मार्गावर घेण्यात आली. मथुरा ते पलवल मार्गावर ताशी १८0 च्या वेगाने चाचणी केली गेली.

वैशिष्ट्ये -

- सुपरफास्ट राजधानीपेक्षाही वेगवान

- सध्या दिल्ली राजधानी ट्रेनला १६ तास लागतात

- ही ट्रेन प्रवाशांचे दोन ते तीन तास वाचवणार आहे.

- संपूर्ण वातानुकूलित

- एसी चेअर कारसह अन्य व्यवस्था

- पेन्ट्री कारची व्यवस्था सध्याच्या भारतीय ट्रेनपेक्षा वेगळी

- अ‍ॅल्युमिनियमचे डबे असल्याने कमी प्रमाणात व्हायब्रेट.

-३0 टक्के कमी ऊर्जा या ट्रेनला लागेल.

- आगीपासून बचाव होईल

पुन्हा प्लॅटफॉर्म गॅप

स्पेनमध्ये टॅल्गो ट्रेन ही नॅरो गेजवर चालवण्यात येते. त्यामुळे तेथील प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील गॅप हा फारसा राहात नाही. मात्र चाचणी करण्यात आलेली ट्रेन मुंबई सेन्ट्रल येथील प्लॅटफॉर्मवर दाखल होताच प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये मोठा गॅप दिसून आला. भारतात ब्रॉड गेजवर ट्रेन चालविण्यात येतात. त्यानुसार ट्रेनची रचना असते. त्यामुळेच फारसा गॅप राहात नाही. त्यानुसारच टॅल्गो ट्रेनमध्ये बदल करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.

 दिल्ली ते मुंबई अशी पहिली चाचणी यशस्वी झाली. आणखी काही चाचण्या घेण्यात येतील आणि त्यानंतरच पुढील निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात येईल. चाचणी घेण्यात आलेली ट्रेन जरी ३२ वर्ष जुनी असली तरी तेथील ट्रेनची केली जाणारी देखभाल-दुरुस्ती आणि अन्य सुविधा पाहता ट्रेनची कालमर्यादा ही ५0 ते ६0 वर्षापर्यंत जाते.रविन्द्र भाकर (पश्चिम रेल्वे-मुख्य जनसंपर्क अधिकारी)