शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना कर्जमुक्त, जीएसटीमुक्त करणार: राहुल गांधी, भारत जोडो न्याय यात्रेत आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 06:03 IST

देशात आपले सरकार आल्यास राज्यातील महाविकास आघाडी असो अथवा राजधानी दिल्लीतील सरकार असो, शेतकऱ्यांसाठी सदैव दरवाजे खुले राहतील, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : बड्या उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले जाते मग, या शेतकऱ्यांचे कर्ज माफ का होऊ शकत नाही, असा प्रश्न करीत केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येईल, या देशात प्रथमच शेतकऱ्यांना जीएसटीच्या माध्यमातून कर लागू करण्यात आला आहे, तो काढून शेतकरी करमुक्त करण्यात येईल, असे आश्वासन काँग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांनी दिले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त गुरुवारी नाशिक जिल्ह्यातील चांदवड बाजार समिती येथे सभेत ते बोलत होते. 

शेतकऱ्यांसाठी सदैव दारे उघडी ठेवणार

- शेतकऱ्यांच्या समस्यांवर चार मात्रा सांगत राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना उत्तर दिले. 

- याशिवाय देशात आपले सरकार आल्यास राज्यातील महाविकास आघाडी असो अथवा राजधानी दिल्लीतील सरकार असो, शेतकऱ्यांसाठी सदैव दरवाजे खुले राहतील, असे सांगितले.

अन्य मुद्दे पुढे आणून दिशाभूल केली जातेय

या यात्रेत महाविकास आघाडीचे नेते म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. देशात महागाई, बेरोजगारी, भागीदारी, धर्म आणि शेतकरी अशा अनेकांच्या समस्या असल्या तरी प्रत्यक्षात त्याकडे दुर्लक्ष केले असून, राम मंदिर किंवा अन्य मुद्दे पुढे आणून दिशाभूल केली जाते, असे सांगून देशातील धनाढ्य उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करणाऱ्या भाजप सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन देऊन देखील तशी कृती केली नाही, याचा पुनरुच्चार करून त्यांनी शेतकरी समस्याग्रस्त असून, त्यांच्या समस्यांवर उपचार म्हणून केवळ एक मात्रा चालणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल, देशात जीएसटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर प्रथमच लागू करण्यात आलेला कर मागे घेण्यात येईल. हमीभाव देणे कायद्याने शक्य नाही, असे सरकारकडून सांगितले जाते. मात्र, या आयोगांच्या शिफारशीनुसार किमान आधारभूत किंमत देण्यात येईल, असे ते म्हणाले.   

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीNashikनाशिकcongressकाँग्रेस