बारामतीतही शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By Admin | Updated: October 21, 2015 02:45 IST2015-10-21T02:45:32+5:302015-10-21T02:45:32+5:30
बारामतीतही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे, पण पवारांच्या दबावामुळे या आत्महत्या सरकारी नोंदीवर येत नाहीत, असा दावा भाजपा प्रदेश प्रवक्त्या कांताताई नलावडे

बारामतीतही शेतकऱ्यांच्या आत्महत्या
सातारा : बारामतीतही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे, पण पवारांच्या दबावामुळे या आत्महत्या सरकारी नोंदीवर येत नाहीत, असा दावा भाजपा प्रदेश प्रवक्त्या कांताताई नलावडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. बारामती शहर सोडता, पाच किलोमीटर अंतरावर पिण्याचे पाणी मिळत नाही. मात्र, बारामती व विद्या प्रतिष्ठान एवढ्याच गोष्टींचे भांडवल करून वरिष्ठ नेत्यांना बारामतीत बोलावले जाते, असेही त्या म्हणाल्या.
राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या अनुषंगाने १९ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत भाजपा वर्षपूर्ती सप्ताह राबविणार असून, लोकसंवादातून केलेल्या कामांची माहिती राज्यभर पोहोचविणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. (प्रतिनिधी)