शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

कांदा निर्यातबंदीविरोधात शेतकरी रस्त्यावर; ठिकठिकाणी रास्ता रोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 06:30 IST

नाशिक जिल्ह्यात लासलगाव, सटाणा, उमराणेसह ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत महामार्गावरील वाहतूक काही काळ रोखून धरली.

नाशिक /नगर/धुळे : केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, हा निर्णय तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात कांदा उत्पादक भागात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.नाशिक जिल्ह्यात लासलगाव, सटाणा, उमराणेसह ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत महामार्गावरील वाहतूक काही काळ रोखून धरली. कृषिमंत्री दादाजी भुसे यांनीही निर्यातबंदीला विरोध केला आहे. निर्यातबंदी शेतकºयांच्या हिताची नसल्याचे सांगत हा निर्णय केंद्र शासनाने त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी दादाजी भुसे यांनी केली.लासलगाव बाजार समितीच्या विनंतीनंतर आंदोलकांनी माघार घेतल्याने कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू झाले. जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरामध्ये घसरण झालेली दिसून आली. नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात निर्यातबंदी आदेशाची होळी करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह भारतीय कम्युनिस्ट पक्ष आदींनी आंदोलन केले. शेवगाव, पारनेर आदी ठिकाणी शेतकºयांनी निदर्शने केली. पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी कांदा प्रश्नावर शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली.कांद्याचे दर पडलेनाशिक जिल्ह्यात लासलगाव बाजार समितीत सकाळी केवळ तीन ट्रॅक्टर कांद्याचा लिलाव झाला. क्विंटलचे दर १,२८० ते २२०० रूपयांपर्यंत घसरल्याने शेतकºयांनी लिलाव बंद पाडले. त्यानंतर लिलाव झाले नाही. पिंपळगाव बाजार समितीत २१ हजार क्विंटल आवक झाली. सरासरी भाव २,३१५ जास्तीत जास्त २,९०० तर कमीतकमी १५०० जाहीर झाला.सोमवारच्या तुलनेत मंगळवारी पिंपळगाव बाजार समितीत १,०९० रूपयांची घसरण झाली. त्यामुळे दुपारी शेतकºयांनीकांदा लिलाव बंद पाडले. अधिकाºयांच्या मध्यस्थीने कांद्याच्या भावात ५०० रुपयांची वाढ होऊन बाजारभाव ३,४०० रुपये पुकारण्यात आले. त्यानंतर लिलाव झाले. सरासरी भाव २,९०० रुपये जाहीर झाला होता.फेरविचाराची सरकारची ग्वाहीकेंद्र सरकारने आकस्मिकपणे कांद्याची निर्यातबंदी जाहीर केली. त्यावर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक भागात तीव्र प्रतिक्रिया उमटली व विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी माझ्याशी काल रात्री संपर्क करून केंद्र सरकारला या प्रतिक्रियेबाबत अवगत करण्याची विनंती केली. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतल्यानंतर ते म्हणाले की, कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयातर्फेबाजारातील वाढत्या किमतीच्या आधारावर आला आहे. या संदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि ग्राहक संरक्षण मंत्रालय या तिन्ही मंत्रालयांशी चर्चा करून आम्ही निर्यातबंदीचा फेरविचार करू. एकमत झाल्यास याबाबतीत पुनर्निर्णय घेऊ, असे गोयल यांनी सांगितले.- शरद पवार,माजी केंद्रीय कृषिमंत्रीशेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकारकेंद्राचा निर्णय म्हणजे राज्यातील कांदा उत्पादक शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. केंद्र सरकारने जर ऐकले नाही तर शेतकºयांना आधी मिळणारा दर आणि निर्यातबंदीनंतर मिळणाºया दरातील नुकसानीचा फरक केंद्राने दिला पाहिजे, अशी माझी मागणी आहे. कांद्याच्या निर्यातीवर बंदी लादून कांदा उत्पादक शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. आताच्या घडीला राज्यातील कांदा उत्पादक शेतकºयांना ७०० रुपयांपासून ते दोन हजार ५00 रुपयांपर्यंत भाव मिळत होता. तो घसरला आहे. - दादा भुसे, कृषिमंत्रीकाँग्रेसचे आज राज्यव्यापी आंदोलनकांद्याला आता कुठे चांगला भाव येऊ लागल्याचे दिसत होते. चार पैसे हातात पडतील, अशी आशा शेतकºयाला होती. केंद्रातील लहरी मोदी सरकारने अचानक निर्यातबंदी जाहीर करून शेतकºयांवर घोर अन्याय केला आहे. ही निर्यातबंदी तत्काळ मागे घ्यावी. केंद्र सरकारच्या या अन्यायी निर्णयाविरोधात काँग्रेस पक्ष बुधवारी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. कांदा, बटाटा, डाळींना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले असल्याची घोषणा करून केंद्र सरकारनेस्वत:ची पाठ थोपटवून घेतली होती. मग तीन महिन्यांत निर्णय का फिरवला? - बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री तथामहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्षबंदी हटविण्याबाबत निर्णय अपेक्षितकांद्याचे भाव वाढतील ही भीती बाळगून केंद्र सरकारने निर्यातबंदी तातडीने लागू केल्याने आधीच लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयांचे आणखी हाल होतील. दिल्लीत केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन चर्चा केली. लवकरच कांदा निर्यातबंदी हटविण्याबाबत निर्णय होईल, अशी आशा आहे.- खा. डॉ. सुभाष भामरे, माजी संरक्षण राज्यमंत्रीकेंद्रसरकारकडून शेतक-यांचा विश्वासघातकेंद्रसरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी लादून कांदा उत्पादक शेतकºयांचा विश्वासघात केला आहे. बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकºयांचे कोट्यवधींचे नुकसान होणार आहे. अगोदरच कोरोना महामारीमुळे शेतकरी हवालदिल झाला असताना केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकºयांवर मोठा आघात होणार आहे.- डॉ. अजित नवले, किसान सभा

टॅग्स :onionकांदाNashikनाशिक