शहापूर (ठाणे) : सरकारने शेतीमालाला योग्य भाव दिला, तर भविष्यात कर्जमाफीची गरज उरणार नाही. पण आता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केलाच पाहिजे. तो कोरा केला नाही तर शिवरायांचा राज्याभिषेक झाला तेथून म्हणजे रायगडातून संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरु वात होईल. त्यानंतर मात्र ‘याचना नहीं, अब रण होगा, संघर्ष बडा भीषण होगा,’ असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.शेतकरी संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा शहापूर येथे समारोप झाला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील, आ. पांडुरंग बरोरा, आ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह शंभरहून अधिक आमदार उपस्थित होते. शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग होऊ देणार नाही, असे पवार यांनी ठामपणे सांगितले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केलाच पाहिजे
By admin | Updated: April 19, 2017 02:32 IST