शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

तासाभरातच धान्य संपल्याने शेतकरी हरखले

By admin | Updated: May 2, 2017 02:46 IST

शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट ग्राहकापर्यंत पोचल्याचा कसा फायदा होतो, त्याच अनुभव सोमवारी ठाण्यातील आंबा आणि धान्य महोत्सवात

ठाणे : शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट ग्राहकापर्यंत पोचल्याचा कसा फायदा होतो, त्याच अनुभव सोमवारी ठाण्यातील आंबा आणि धान्य महोत्सवात आला. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे धान्य थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचा पहिला प्रयोग सुरू झाला आणि त्याचा शुभारंभ होण्याच्या आधीच काही शेतकऱ्यांचे २०० किलो मुग आणि हरडा, शेवया, रवा असे एक क्विंटल धान्य काही तासातच संपल्याने शेतकरी हरखून गेले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पसरला आणि इतर शेतकऱ्यांनाही हुरूप आला. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर मार्ग काढण्यासाठी त्यांचा माल थेट ग्राहकापर्यंत पोचविण्याचा प्रयोग विविध ठिकाणी राबविला जात आहे. याचाच एक भाग म्हणून ठाण्याच्या गावदेवी मैदानात धान्य महोत्सव सुरू झाला. यात मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, हिंगोली आदींसह इतर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आशेने सहभागी झाला आहे. मालाला चांगला भाव मिळेल की नाही, याबाबत त्याच्या मनात शंका होती. परंतु नाम फाऊंडेशन आणि संस्कार प्रतिष्ठानची साथ त्यांना लाभल्याने पहिल्याच दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललेले पाहावयास मिळाले. हिंगोलीवरुन प्रकाश हिंगोले आणि उत्तम भोईर यांनी आणलेले २०० किलो मूग हा महोत्सव सुरु होण्यापूर्वीच स्टॉल मांडत असतांनाच संपल्याने त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. दुसरीकडे शारदा आणि त्यांचे पती अण्णासाहेब जगताप यांनी हुरडा, भरडा, शेवाळ्या रवा, असा जव जवळ दीड क्विंटलचा माल येथे विकण्यासाठी आणला होता. त्यातील एक क्विंटल मालदेखील महोत्सव सुरु होण्यापूर्वीच हातोहात संपल्याने त्यांनाही आनंद झाला. शेतकऱ्याला या महोत्सवाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्या कामाचा आणि श्रमाचा मोबदला मिळत असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या महोत्सवाच्या माध्यमातून गहू, जवस, मूग, ज्वारी, हळद, तूर, तुरडाळ आदींसह इतर धान्य विकण्यासाठी ठेवण्यात आले आहे. हे धान्य सेंद्रीय पध्दतीने पिकविण्यात आल्याने मागणी वाढत असल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)आम्ही पिकवणार, आम्हीच विकणारआमच्या शेतातून पिकविलेला माल आणि त्यालाही चांगली किमंत आम्हाला मिळत आहे. त्यामुळे व्यापाऱ्याकडे हात पसरविण्याची आता आम्हाला गरज राहिलेली नाही. आम्हीच पिकविणार आणि आम्हीच विकणार त्यामुळेच दिड क्विंटल मालापैकी तब्बल १ क्विटंल माल अवघ्या काही तासात विकला गेल्याचे समाधान आहे.- शारदा आणि अण्णासाहेब जगताप, हिंगोलीपूर्वी व्यापाऱ्यांच्या हाती आपला माल दिल्यावर त्याला हव्या त्या किंमतीत तो माल खरेदी करीत होता. परंतु बाजारात मात्र दुप्पट भावाने विकत होता. यामुळे आम्हा शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. परंतु आता आमचा माल आम्हीच विकत असल्याने आणि पहिल्यापेक्षा १५ ते २० टक्के अधिक मोबदला मिळत असल्याने त्याचा आनंद आहे. - रायचुरे कदम, बीडव्यापाऱ्यांना माल विकत असतांना त्याठिकाणी दलालांना देखील मलिदा मिळत होता. त्यात व्यापाऱ्यांपर्यंत माल पोहचविण्याचा जबाबदारी आम्हा शेतकऱ्यांच्या खांद्यावर होती. परंतु फायदा मात्र व्यापारी उचलत होता. परंतु आता खऱ्या अर्थाने आम्हाला चांगला भाव मिळत असल्याचे समाधान मिळत आहे.- उत्तरेश्वर नखाते व सतीश निगडे, बीडसेंद्रीय पध्दतीने आम्ही धान्य पिकवत असल्याने आणि थेट ग्राहकापर्यंत जाण्याचा मान आम्हाला आता मिळत असल्याने आमच्याबरोबर ग्राहकांना देखील कमी भावात उच्च दर्जाचा माल मिळत आहे. - देविदास खोटे, बोरखडे, बीडशेतकऱ्यांना त्यांनी पिकविलेल्या मालाचा चांगला मोबदला मिळावा म्हणून हे पाऊल नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून उचलण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना आता व्यापाऱ्यांकडे जाण्याची गरज नसून त्यांचा माल थेट ग्राहकाच्या हाती पडत असून तो ही मार्केटपेक्षा कमी किमतीत मिळत आहे. - राजाभाऊ शेळके, नाम फाऊंडेशनचे पदाधिकारीकोकण आणि मराठवाड्याचा हा एक सुंदर मिलाप आहे, एकीकडे कोकणातील आंबा आणि दुसरीकडे विदर्भातील धान्य एकाच छताखाली ग्राहकांना मिळण्याची संधी या महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध झाली असून शेतकऱ्यांना देखील पहिल्याच दिवशी ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. - आमदार संजय केळकर, आयोजक