शेतक:यांची चेष्टा करू नका

By Admin | Updated: November 25, 2014 01:49 IST2014-11-25T01:49:27+5:302014-11-25T01:49:27+5:30

मोबाइल बिल अन् वीज बिलाची तुलना करून शेतक:यांची क्रूर चेष्टा करण्याचा उद्दामपणा सहन केला जाणार नाही. तुमच्यात अन् आधीच्या सरकारात मग फरक काय?

Farmers: Do not taunt | शेतक:यांची चेष्टा करू नका

शेतक:यांची चेष्टा करू नका

>उद्धव यांनी खडसेंना खडसावले : तुमच्यात अन् आधीच्या सरकारात मग फरक काय?
नांदेड : मोबाइल बिल अन् वीज बिलाची तुलना करून शेतक:यांची क्रूर चेष्टा करण्याचा उद्दामपणा सहन केला जाणार नाही. तुमच्यात अन् आधीच्या सरकारात मग फरक काय? एकूणच अजित पवार काय अन् खडसे काय, एकच! अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना खडसावले.
 शिवसेनेच्या 63 आमदारांना सोबत घेऊन उद्धव यांनी दुष्काळी भागाचा पाहणी दौरा काढला आहे. त्याची सुरुवात सोमवारी नांदेड जिल्ह्यातील बाभूळगाव येथून झाली. पण त्यांच्यासमवेत युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, विरोधीपक्षनेते एकनाथ शिंदे,  आ़ नीलम गो:हे, खा़ चंद्रकांत खैरे यांच्यासह 42 आमदारच होते. उर्वरित आमदार रामदास कदम यांच्यासमवेत उस्मानाबाद, तुळजापूर भागात पाहणी करण्यासाठी गेल्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले. बाभूळगाव येथील आत्महत्या केलेले शेतकरी सुधाकर मोरे यांच्या कुटुंबीयांना शिवसेनेच्या वतीने 1 लाख रुपयांची मदत दिली़ तर आ़ नीलम गो:हे यांनीही 25 हजारांची मदत दिली़ 
या वेळी बोलताना उद्धव म्हणाले, हा दौरा म्हणजे ‘पिपली लाइव्ह’सारखी नौटंकी नाही. पूर्वीच्या सरकारसारखेच हे सरकारदेखील शेतक:यांच्या प्रश्नांवर असंवेदनशील आहे.  मोठय़ा कष्टाने हे सरकार सत्तेत आले, पण जी मस्ती पवारांना होती तीच तुम्ही करणार असाल तर सत्ता सोडून द्या, असे आव्हानही त्यांनी दिले. (प्रतिनिधी)
 
काय म्हणाले होते खडसे?
च्रविवारी अकोल्यात महसूलमंत्री खडसे यांनी दुष्काळी परिस्थितीची आढावा बैठक घेतली. यावेळी मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी कृषी क्षेत्रतील रोहित्र बदलण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर खडसे यांनी शेतक:यांकडे मोबाइलचे देयक भरण्यासाठी पैसे असतात, मग वीज देयक का भरत नाही, असा खोचक प्रतिप्रश्न केला. 
च्यावरच न थांबता खडसे पुढे म्हणाले, तुम्ही 
मोबाइलचे हजार रुपये बिल आले तरी ते भरता. कारण मोबाइल कट नको व्हायला.. पोरीसोबत बोलता येत नाही, बरोबर आहे ना! 
 
शेतक:यांसाठी विरोधी पक्षच!
च्आम्ही भाजपाचे मित्र आहोत किंवा नाहीत हा विषय बाजूला ठेवून शेतक:यांच्या प्रश्नांवर शिवसेना विरोधी पक्ष म्हणूनच काम करेल, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी शेतक:यांना 
दिली़

Web Title: Farmers: Do not taunt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.