शेतकऱ्यांना वीज बिल माफी नाहीच : चंद्रशेखर बावनकुळे
By Admin | Updated: April 20, 2017 17:43 IST2017-04-20T17:43:53+5:302017-04-20T17:43:53+5:30
शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत वीज बिल माफी देणार नाही, मात्र त्यांच्या थकबाकीवरील दंड व्याज माफ करणार

शेतकऱ्यांना वीज बिल माफी नाहीच : चंद्रशेखर बावनकुळे
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 20 - शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत वीज बिल माफी देणार नाही, मात्र त्यांच्या थकबाकीवरील दंड व्याज माफ करणार असल्याचे राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पुण्यात बैठकीदरम्यान म्हणाले.
शेतकऱ्याना त्यांची थकबाकी पाच टप्प्यात भरण्याची सुविधा देण्यात आली असून दर तीन महिन्यांनी टप्प्याटप्प्याने पैसे भरण्याची मुभा देण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. पुण्यातील विधान भवनमध्ये बावनकुळे यांनी पुण्यातील आमदार, खासदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीमध्ये काही लोकप्रतिनिधीनी शेतकऱ्यांना वीज बिल माफी द्यावी अशी मागणी केली. ही मागणी धुडकावत बावनकुळे यांनी वीज बिल माफी देणार नाही असे स्पष्टपणे सांगितले. वीज बिलांची वसुली करण्यासाठी स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी यांनी मेळावे घ्यावेत, वसुली झाल्या नंतरच नवीन कनेक्शन देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.