शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शासनाची वाट न पाहता शेतकऱ्यांनी केला स्वखर्चाने रस्ता दुरुस्त, लालफितीच्या कारभारावर वर्गणी करुन केली मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 12:40 IST

गाव आणि परिसराच्या विकासासाठी शासनावर अवलंबून न राहता गावकऱ्यांनीच पुढाकार घेऊन जवळपास तीन किलोमीटरचा रस्ता दुरुस्त केला

ठळक मुद्दे गाव आणि परिसराच्या विकासासाठी शासनावर अवलंबून न राहता गावकऱ्यांनीच पुढाकार घेऊन जवळपास तीन किलोमीटरचा रस्ता दुरुस्त केला. उंबरखेड- दडापिंप्री (ता. चाळीसगाव) येथील शेतकऱ्यांनी वर्गणी करुन लालफितीच्या कारभारावर मात केली आहे.

- विजय पाटील

चाळीसगाव- गाव आणि परिसराच्या विकासासाठी शासनावर अवलंबून न राहता गावकऱ्यांनीच पुढाकार घेऊन जवळपास तीन किलोमीटरचा रस्ता दुरुस्त केला. उंबरखेड- दडापिंप्री (ता. चाळीसगाव) येथील शेतकऱ्यांनी वर्गणी करुन लालफितीच्या कारभारावर मात केली आहे.

चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड हे आठ हजार लोकसंख्येचे गाव. या गावापासून दडपिंप्री हे जवळचे गाव. पण दोन्ही गावे जवळ असूनही रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची दुरवस्था. अनेक वेळा अर्जफाटे करुन शासकीय यंत्रणा हालचाल करण्यास तयार नव्हती. शेवटी परिसरातील शेतकऱ्यांनाच यासाठी वर्गणी करण्याची वेळ आली. उंबरखेड-दडपिंप्री रस्त्यावर बऱ्याच वर्षापासून खडी टाकून ठेवण्यात आली होती. मोठमोठे खड्डे पडलेले. उंबरखेड गावात प्राथमिक आरोग्य केंद्र, हायस्कूल, कॉलेज, बँक शाखा आहेत. गावापासून जवळच असलेल्या दडापिंप्री, चिंचखेडे इथल्या लोकांचा उंबरखेडशी संबंध येतो.

दडापिंप्री आणि चिंचखेडे येथे रात्री कुणी आजारी पडले तर त्याला आरोग्य केंद्रापर्यंत आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. शिवाय कॉलेज, हायस्कूलमध्ये जाणाºया विद्याथ्याचे तर हाल होत होते. सायकल सोडाच साधे पायीदेखील या रस्त्यावरून चालता येत नव्हते. तसेच या रस्त्याला अनेक शेतशिवार, रस्ते जोडले जोडण्यात आले आहेत. या रस्त्यावरून शेतमाल घेऊन जाणे हे एक कठीण काम झाले होते.

आता साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. उंबरखेड-दडपिंप्री-चिंचखेडे येथील शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली आहे. रस्त्याची स्थिती बिकट असल्याने ऊसाची वाहतूक करता येत नव्हती आणि वाहनचालकही शेतापर्यंत वाहन आणण्यास तयार नव्हते.लोकप्रतिनिधी तसेच संबंधित विभागाला कळवून देखील दुर्लक्ष केले जात होते. यावर शेतकºयांनीच उपाय शोधून काढला. चिंचखेडे, दडपिंप्री येथील काही शेतकऱ्यांनी जेसीबी लावून स्वखर्चाने रस्ता दुरुस्त केला. याकामी शेतकरी विजय ठाणसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली ओंकार पवार, अशोक जाधव, सुदाम राठोड, विकास राठोड, संजय राठोड, कैलास पाटील, संजय पवार, धनराज पाटील या शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला.