'मोदींसारखी पारदर्शकता नसल्यानेच राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 02:35 IST2019-12-30T02:34:18+5:302019-12-30T02:35:04+5:30

फडणवीस यांची टीका; सरसकट कर्जमाफी नसल्याचा मांडला मुद्दा

Farmers cheat due to lack of transparency like Modi | 'मोदींसारखी पारदर्शकता नसल्यानेच राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक'

'मोदींसारखी पारदर्शकता नसल्यानेच राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक'

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात आखलेल्या सर्व योजना पारदर्शी असून, त्यात अटी-शर्ती नाहीत. मात्र सातबारा कोरा करू, सरसकट कर्जमाफी देऊ असे सांगणाऱ्यांनी महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी अटी-शर्ती लादून फसवणूक केली आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नाशिकमध्ये केली.

‘आयुष्यमान भारत योजने’अंतर्गत मध्य नाशिक मतदारसंघामधील पाच हजार कार्डांचे वितरण रविवारी त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ‘आयुष्यमान भारत’ ही अत्यंत पारदर्शी योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वच योजना अशाच पारदर्शी असतात. त्यात अटी-शर्ती नसतात. मात्र राज्यातील सरकारे मात्र एक लाख रुपयात बंगला आणि खाली अटी-शर्ती लागू अशा स्वरूपाच्या योजना करू लागले आहेत. निवडणुकीत शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देऊ, सातबारा कोरा करू, असे आश्वासन दिले गेले. मात्र सत्ता आल्यानंतर अटी-शर्ती लादण्यात आल्या. त्यामुळे शेतकºयांना त्याचा फायदा झाला नाही. आमचे सरकार सत्तेवर असताना त्यावेळी शेतकºयांना आधार लिंक करण्यास सांगितले, त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, असे सांगितले गेले. मात्र आता जीआर बघा, प्रत्यक्ष ‘आपले सरकार सेवा केंद्रा’त जाऊन आपल्या नावावर किती कर्ज आहे, त्यातील किती भरपाई मिळणार आहे, ते बघा, ते मान्य असेल तर अपलोड करा अशा प्रकारच्या अटी-शर्ती लागू करण्यात आल्या आहेत, त्यामुळे ही कर्जमाफी पूर्णत: फसवी आहे, असे फडणवीस म्हणाले.

यावेळी फडणवीस यांच्या हस्ते चार लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात आयुष्यमान कार्डांचे वाटप करण्यात आले. माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे तसेच जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी वेळी मनोगत व्यक्त केले.

बेळगावप्रश्नी मराठी माणसाबरोबरच राहणार
बेळगावमधील मराठी माणसाच्या प्रश्नावर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी मराठी माणूस हा मराठी माणसाबरोबरच राहील, असे स्पष्ट केले आणि नाशिकमध्ये निओ मेट्रो रद्द करण्यासाठी घालण्यात आलेला घाट दुर्दैवी आहे. योजनेविषयी शंका असतील, तर त्या समजावून घ्या, परंतु नाशिककरांचे नुकसान करू नका, असेही फडणवीस म्हणाले.

Web Title: Farmers cheat due to lack of transparency like Modi