शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

"फडणवीस यांच्या सरकारमध्ये शेतकरी संकटात; शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा लढा आणखी तीव्र करू’’, काँग्रेसचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 18:39 IST

Harshwardhan Sapkal News: फडणवीस यांच्या सुलतानी सरकारमध्ये शेतकरी संकटात आहे, असा आरोप करत शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा लढा आणखी तीव्र करू असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.  

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज शेतकऱ्यांच्या होत असलेल्या अनास्थेच्या मुद्द्यावरून राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार टीका केली. फडणवीस यांच्या सुलतानी सरकारमध्ये शेतकरी संकटात आहे, असा आरोप करत शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा लढा आणखी तीव्र करू असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.   काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली अमरावतीत भव्य ट्रॅक्टर मोर्चा व तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, इकडे राज्यातील शेतकरी मात्र संकटात आहे, सरकारचे त्याकडे लक्ष नाही, कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणून अपमान करत असतात. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे तूर १२ हजार रुपयावरून ६ हजार रुपये झाली आहे. कारण शेतकऱ्याची तूर बाजारात येत असताना केंद्रातील भाजपा सरकारने तूर आयात करून भाव पाडले. सोयाबिन ४ हजार रुपयांच्या वर जात नाही, शेतमालाला भाव नाही. पीक कर्ज मिळत नाही म्हणून शेतकऱ्याला सावकारच्या दारात उभे रहावे लागत आहे. या परिस्थितीला फडणवीसांचे सुलतानी सरकार जबाबदार आहे. 

काँग्रेसच्या आजच्या ट्रॅक्टर रॅलीने आंधळ्या, बहिऱ्या सरकारचे डोळे उघडतील अशी आशा आहे पण सरकारने बळीराजाला नाडवले, शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही केली आणि शेतमालाला योग्य भाव मिळला नाही तर हा लढा आणखी तीव्र करू आणि त्यानंतर जो परिणाम होईल त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिला आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व राज्याचे सहप्रभारी कुणाल चौधरी व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी केंद्र व राज्यातील भाजपा सरकारवर हल्लाबोल केला. संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, जय जवान, जय किसान, अशा घोषणा या रॅलीत देण्यात आल्या. 

राज्यभर काँग्रेसची "तिरंगा यात्रा"..महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आज राज्यभर  सर्व जिल्हा व तालुक्यात तिरंगा यात्रा काढून ‘ऑपरेशन सिंदूर’ मधील वीरांना अभिवादन करण्यात आले. ‘जरा याद करो कुर्बानी’ या प्रेरणादायी संकल्पनेतून ही तिरंगा यात्रा काढण्यात आली. काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक या यात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Harshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळcongressकाँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार