शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी, शेतकऱ्यांचं आंदोलन मागे; सरकारकडून लेखी आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 19:45 IST

सरकारकडून मोर्चेकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य

मुंबई: फडणवीस सरकारनं दिलेल्या लेखी आश्वासनानंतर शेतकरी आणि आदिवासींनी आंदोलन मागे घेतलं आहे. शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी 'उलगुलान मोर्चा' काढला होता. हा मोर्चा आज आझाद मैदानात धडकला. यानंतर मोर्चेकऱ्यांची शिष्टमंडळाशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. यानंतर सरकारनं मोर्चेकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्यामुळे मोर्चेकऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त 'एबीपी माझा'नं दिलं आहे.आज दुपारी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबद्दल मोर्चेकऱ्यांना लेखी आश्वासन देण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. पुढील तीन महिन्यात सर्व प्रलंबित प्रकरणं निकालात काढण्याचं लेखी आश्वासनं सरकारकडून शेतकरी आणि आदिवासींना देण्यात आलं. आदिवासी जमिनीच्या पट्टेधारकांना सर्व दुष्काळी सवलती दिल्या जाणार आहेत. तर शेतीसाठी खवटी अनुदान देण्याबद्दलही निर्णय झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. गैरआदिवासी आणि आदिवासींना तीन पिढ्यांच्या रहिवासाची अट रद्द करण्याच यावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली होती. याबद्दल राज्य सरकार केंद्राकडे शिफारस करणार असल्याचं सरकारनं सांगितलं. वन्य जमीन प्रकरणातले ८० टक्के दावे सरकारने फेटाळले होते. या दाव्यांचं सरकारकडून पुनरावलोकन केलं जाणार आहे. सर्व दावेदारांची नावं एकाच सातबाऱ्यावर न चढवता स्वतंत्र सातबारे दिले जाणार आहेत.  

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनMaharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस