शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

साक्री तालुक्यात उपक्रमशील शेतकरी यांनी केला डॉ.नरेंद्र भदाणे गुलाब शेतीचा पहिला प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 08:24 IST

एकाच पिकावर अवलंबून न राहता व पारंपरिक शेती न करता आधुनिक पद्धतीने प्रयोग युक्त शेती करणारे सामोडे येथील शेतकरी व डॉक्टर नरेंद्र रावसाहेब भदाणे यांनी गुलाब शेती करुन तालुक्यात प्रथमच नवउपक्रम केला आहे.

ठळक मुद्देआधुनिक पद्धतीने प्रयोग युक्त शेती करणारे सामोडे येथील शेतकरी व डॉक्टर नरेंद्र रावसाहेब भदाणे यांनी गुलाब शेती करुन तालुक्यात प्रथमच नवउपक्रम केला आहे.डॉ.भदाणे यांनी एक एकर पालॉहाऊसमध्ये टॉप सिक्रेट नावाच्या लाल गुलाबाची लागवड केली आहे.

- विशाल गांगुर्डेधुळे - एकाच पिकावर अवलंबून न राहता व पारंपरिक शेती न करता आधुनिक पद्धतीने प्रयोग युक्त शेती करणारे सामोडे येथील शेतकरी व डॉक्टर नरेंद्र रावसाहेब भदाणे यांनी गुलाब शेती करुन तालुक्यात प्रथमच नवउपक्रम केला आहे. डॉ.नरेंद्र रावसाहेब भदाणे हे एक तरुण शेतकरी आहेत. शेती करताना भविष्यातील गरज लक्षात घेता शेती उत्पन्न घेण्याची त्यांची पद्धत असल्याने शेतीत नवनव्या शेतीपुरक उत्पन्नांची निर्मिती करत असतात.डॉ.भदाणे यांनी एक एकर पालॉहाऊसमध्ये टॉप सिक्रेट नावाच्या लाल गुलाबाची लागवड केली आहे. साधारण ३२ हजार रोपांची लागवड त्यांनी आॅगस्ट ते सप्टेंबर या महिन्यात केली व ५० ते ५५ दिवसानंतर त्यांनी लाल गुलाब फुलाचे उत्पन्न घेणे सुरू केले आहेत. सध्या बांधावर हे फुल १० रुपये नगाने विक्री होत आहे. दररोज साडेतीन ते चार हजार फुल एका दिवसाला निघत असल्याने डॉ.भदाणे हि फुले सध्या दिल्ली, बडोदा, सुरत व नागपूर मार्केटमध्ये विक्रीसाठी जात आहे. शेताच्या बांधावरच व्यापारी येत असल्ळाने कुठल्याही प्रकारचा इतर खर्च शेतकऱ्यास नाही.डॉ.भदाणे यांनी व्हॅलेंटाईन-डे फेब्रुवारीत असल्याने लाल गुलाबाला मागणी देशभरात असल्याने त्या नियोजनाने ही शेती केली आहे. सदर गुलाब शेतीला दररोज १५ ते २० मिनीट पाणी द्यावे लागते. सदर गुलाब शेतीसाठी हलक्या मुरमाड जमिनीत फुल चांगले येते असे डॉ.भदाणे यांनी यावेळी सांगितले.डॉ.भदाणे हे प्रगतशील शेतकरी असल्याने ते आपल्या शेतात नवनवीन पद्धतीची शेती करतात त्यांची शेती सध्या शेतकºयांना रोलमॉडेल म्हणून ओळखली जाते. गुलाब शेतीची प्रेरणा त्यांना पुणे, तळेगाव, दाभाडी येथे ट्रेनिंगसाठी गेले असता मिळाली. डॉ.भदाणे यांनी सद्धा आपल्या शेतात २ एकरमध्ये शिमला मिरचीची लागवड केली आहे. तर १० एकरमध्ये डाळींबाची शेती ते करीत आहेत, शेततळे आहे.शेती क्षेत्रात बदल होणे गरजेचे आहे. आधुनिक पद्धतीने शेती करीत असताना भविष्याची गरज लक्षात घेता शेती उत्पादनाचे पिक घेतले पाहिजे. तरुण शेतक-यांनी नवनवीन उपक्रमाकडे वळावे. यामुळे शेतीत अधिक बदल होऊ शकतो व शेतकºयाचा विकास होईल..- डॉ.नरेंद्र रावसाहेब भदाणे,सामोडे, पिंपळनेर

टॅग्स :agricultureशेतीDhuleधुळेMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरी