शेतक-याने केली पत्नीसह दोन चिमुकल्यांची नृशंस हत्या

By Admin | Updated: March 13, 2016 02:09 IST2016-03-13T02:09:35+5:302016-03-13T02:09:35+5:30

मेहकर तालुक्यातील घटना; झोपेतच केले पहारीने वार, मुलगा गंभीर जखमी.

Farmer murdered two spies with brutal wife | शेतक-याने केली पत्नीसह दोन चिमुकल्यांची नृशंस हत्या

शेतक-याने केली पत्नीसह दोन चिमुकल्यांची नृशंस हत्या

मेहकर (बुलडाणा) : गाढ झोपेत असलेल्या पत्नीसह ३ चिमुकल्यांवर कुर्‍हाडीने वार केल्याची घटना मेहकर तालुक्यातील कासारखेड येथे ११ मार्च रोजी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली. या निर्घृण हत्याकांडात पत्नी व २ मुली ठार झाल्या असून, एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
मेहकर तालुक्यातील कासारखेड येथे समाधान शेषराव अंभोरे (४६) हा त्याची पत्नी सौ.मिना (३५), मुलगी कु. अश्‍विनी (१५), कु. अंकिता (१३) व मुलगा गोपाल (१0) यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. शुक्रवारी मध्यरात्रीदरम्यान समाधान अंभोरे याने अचानक पत्नीसह तिन्ही मुलाबाळांवर कुर्‍हाडीने वार करण्यास सुरुवात केली. रक्ताच्या थारोळ्यात तडफडत असलेल्या मुलाबाळांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तेव्हा शेजार्‍यांनी घटनास्थळी धाव घेवून घरात प्रवेश केला; परंतु कुर्‍हाडीचे घाव गंभीर असल्याने अश्‍विनीचा जागेवरच मृत्यू झाला. पत्नी सौ.मिना व मुलगी अंकिता यांचा मेहकर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुलगा गोपाल हा गंभीर जखमी असून, त्याच्यावर औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेमागचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून, जानेफळ पोलिसांनी आरोपी समाधान अंभोरे यास अटक केली आहे.

Web Title: Farmer murdered two spies with brutal wife