शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या आत्महत्येला भाजपा-शिवसेना सरकार जबाबदार; चिठ्ठी लिहून शेतकऱ्यानं संपवली जीवनयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 10:33 IST

नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

यवतमाळ: नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून यवतमाळमधील शेतकऱ्यानं आत्महत्या केली. शेतकऱ्यानं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत भाजपा-शिवसेना सरकारचा उल्लेख आहे. शेतकऱ्यानं त्याच्या आत्महत्येसाठी राज्य सरकारला जबाबदार धरलं आहे. शेतकऱ्यानं लिहिलेली चिठ्ठी मृतदेहाशेजारी आढळून आली.यवतमाळच्या पांढरकवडामधील पहापळचे रहिवासी असलेल्या 52 वर्षीय धनराज बळीराम नव्हाते यांनी काल आत्महत्या केली. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मृतदेहाजवळ सापडली. यामध्ये त्यांनी त्यांच्या अवस्थेसाठी राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारला जबाबदार धरलं आहे. नव्हाते यांची 4 एकर शेती असून त्यांच्यावर सावकाराचं 2 लाखांचं कर्ज होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली. गेल्या काही वर्षांमध्ये नापिकीमुळे धनराज यांचं शेतीत मोठं नुकसान झालं, अशी माहिती त्यांच्या कुटुंबानं दिली. नव्हाते बुधवारी सकाळी त्यांच्या विवाहित मुलीला भेटण्यासाठी घराबाहेर पडले. त्यांची मुलगी वणीला वास्तव्यास आहे. मात्र ते दुसऱ्या दिवशी घरी परतले नाहीत. यानंतर कुटुंबानं त्यांचा शोध सुरू केला. त्यावेळी त्यांचा मृतदेह त्यांच्याच शेतातील खड्ड्यात सापडला. त्यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याBJPभाजपाShiv Senaशिवसेना