शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
4
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
5
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
6
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
7
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
8
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
9
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
10
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
11
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
12
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
13
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
14
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
15
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
16
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
17
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
18
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
19
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
20
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

जळगावच्या शेतकऱ्याला विमानतळावर अटक

By admin | Updated: June 11, 2015 01:42 IST

देशांतर्गत विमानतळाची सुरक्षा भेदून आत शिरलेल्या चाळीस वर्षीय शेतकऱ्याला ताब्यात घेऊन शनिवारी रात्री त्याच्यावर एअरपोर्ट पोलीस ठाण्यात

मुंबई : देशांतर्गत विमानतळाची सुरक्षा भेदून आत शिरलेल्या चाळीस वर्षीय शेतकऱ्याला ताब्यात घेऊन शनिवारी रात्री त्याच्यावर एअरपोर्ट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची अधिक चौकशी सुरू आहे. राजू राठोड असे अटक करण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तो मूळचा जळगावचा रहिवासी आहे. १५ दिवसांपूर्वी पत्नीशी झालेल्या भांडणानंतर त्याने घर सोडले आणि मुंबई गाठली. या ठिकाणी लहान-मोठे काम करून तो उदरनिर्वाह करीत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. फेरफटका मारीत असताना तो वाकोल्यात पोहोचला आणि त्याने गावदेवी परिसरातील विमानतळाची सुरक्षा भिंत भेदून विमानतळात प्रवेश केला आणि निषिद्ध क्षेत्रामधून तो चालत होता. त्या वेळी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी रोहन मुराडकर यांनी त्याची चौकशी केली. त्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या (सीआयएसएफ) जवानांची मदत घेत त्यांनी राठोडला पोलिसांच्या स्वाधीन केले. राठोडची चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल करीत त्याला न्यायालयात हजर करण्यात आल्याचे एअरपोर्ट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र नागभिरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. राठोडचा घातपाताचा काही उद्देश नसून, या ठिकाणी प्रवेश निषिद्ध असल्याचे माहीत नसल्याने त्याने विमानतळ परिसरात प्रवेश केल्याचे उघड झाल्याचेही नागभिरे यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)